Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही; त्यांच्यावर कारवाई होणार - देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis on Sambhaji Bhide : संभाजी भिडेंवर कारवाई होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
Devendra Fadanvis - Sambhaji Bhide
Devendra Fadanvis - Sambhaji BhideSarkarnama

Mumbai News : राष्ट्रपिता माहात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात अमरावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राज्यभरातून त्यांच्याविरोधात काँग्रेस निषेध आंदोलने करत असून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. दुसरीकडे भिडेंना राजकीय आश्रय असल्याचाही विरोधकांकडून आरोप केला जात असताना, कुणीही याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देऊ नये, राज्य सरकार उचित कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadanvis - Sambhaji Bhide
Raju Patil News : खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच; मनसेचे आमदार राजू पाटलांचा गंभीर आरोप

"संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधच आहे. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. महानायक म्हणून त्यांच्याकडे पहिलं जातं.अशा महानायकाबाबत अशा प्रकारचं वक्तव्य करणं अनुचित आहे. अशी वक्तव्ये भिडे गुरूजींनीच नाही तर दुसरं कुणीही करू नये. अशा प्रकाराच्या वक्तव्यांमुळे करोडो लोकांच्या मनात संतापाची भावना पसरते. महात्मा गांधीविरुद्ध असं बोललेलं लोक कधीही सहन करून घेणार नाहीत. यासंदर्भात राज्य सरकार उचित कारवाई करेल. महात्मा गांधी असो वा स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कोणाच्याही विरूद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.

संभाजी भिडेंचा भाजपशी काही संबंध नाही ते त्यांची स्वतची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचं काही कारण नाहीये. जसं याचा निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरले, तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी ज्यावेळी बोलतात, त्याचाही त्यांनी निषेध केला पाहिजे. पण त्यावेळी ते मिंधे होतात. म्हणून, कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही, असही फडणवीसांनी म्हटलं आहे.

Devendra Fadanvis - Sambhaji Bhide
Prithviraj Chavan Threatening Email : संभाजी भिडेंबाबत विधानसभेत विचारलेल्या प्रश्नामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना धमकी

दरम्यान, अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते, "मोहनदास गांधी हे करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नीचे अपत्य होते.करमचंद गांधी एका मुस्लीम जमीनदाराकडे काम करायचे. पण एक ते त्याच जमीनदाराचे पैसे घेऊन पळून गेले. चिडलेल्या त्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद गांधींच्या चौथ्या पत्नीला पळवून नेलं आणि त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे मोहनदास गांधी हे करमचंद गांधींचे वडील नाहीत. त्यांचे वडील मुस्लीम जमीनदार आहेत.

भिडेंच्या या वक्तव्याप्रकरणी अमरावतीमध्ये संभाजी भिडे यांच्यासह निशांदसिंह जोध, अविनाश जोध व कार्यक्रमाच्‍या इतरही आयोजकांवर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापुरूषांविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करणे, समाजात तेढ निर्माण करणे, गुन्हे भिडेंवर नोंदवले गेले आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com