Eknath Shinde Vs Thackeray : " ठाकरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तेव्हाच..." ; शिंदेंबाबत 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Pune Political News : '' आता पक्ष अडचणीत असताना निधीला साथ न देता निष्ठेला साथ देणारे मावळे ठाकरे कुटुंबाबरोबर आहेत....''
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Sarkarnama

डी. के वळसे पाटील

Manchar : भाजपच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांचे स्मरण करा. महागाई कमी करू,परदेशातील काळे धन परत आणू, प्रत्येक युवक - युवतीच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू असे आश्वासन दाखवले गेले होते. त्याबद्दल ते आता चकार शब्दही काढत नाही. जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेल्यांना या निवडणुकीत हिसका दाखवण्याचे काम जनतेने करावे असे आवाहन शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी केले

आंबेगाव येथे सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आयोजित केलेल्या 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमात आहे बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी मोदी सरकारसह सडकून टीका केली.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
Ambadas Danve On Maratha Reservation : शिवसेनेला डावलणे कोतेपणाचे लक्षण, सरकार आरक्षणावरून राजकारण करतयं..

या कार्यक्रमाला पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, माऊली खंडागळे, विजया शिंदे, प्रज्ञा भोर, शरद चौधरी, तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे, महिला प्रमुख सुरेखा अनिल निघोट, विकास जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचे नाव न घेता त्यांच्यावर अहिर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांना स्वाक्षरी करणे ही अवघड जात होते. याचवेळी त्यांच्याविरोधात षडयंत्र करण्याचे काम काही मंडळींनी केले. त्यांना साथ देण्याऐवजी त्यांचे पाय ओढण्याचे काम करण्यात आले. आता पक्ष अडचणीत असताना निधीला साथ न देता निष्ठेला साथ देणारे मावळे ठाकरे कुटुंबाबरोबर आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.

सध्या देशाचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांचा हा प्रयत्न हाणून पाडावा . निवडणुकांना भाजप घाबरले आहे. त्यामुळेच महानगरपालिका, नगर पालिका नगरपंचायत, जिल्हा परिषद या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत. सुरेशराव भोर यांच्या नेतृत्वाखाली चांगले पक्ष बांधण्याचे काम सुरू आहे गणेश उत्सव नंतर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) होणार आहेत त्यावेळी ते खोक्या वाल्यांचा समाचार घेतील असेही सचिन अहिर म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray
CM Eknath Shinde News : मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्षांचे सहकार्य अपेक्षित, राजकारण न करण्याची शिंदेंची साद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com