Raigad News : सत्तानाट्यामध्ये संभाजीराजेंचे रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद धोक्यात ?

Bharat Gogawale And Sambhajiraje : मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची वर्णी लागण्याची शक्यता
Bharat Gogawale, Sambhajiraje
Bharat Gogawale, SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Bharat Gogawale And Raigad Pradhikaran : राज्यातील सत्ता नाट्यात नाराज आमदारांची मनधरणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र आहे. शिंदे-फडणवीस सरकारला वर्ष होऊनही मंत्रिपदाचे अश्वासन पूर्ण होत नसल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, दोन आमदारांमध्ये हमरीतुमरी झाल्याची माहिती आहे. यामध्येच आता महाडचे आमदार भरत गोगावले यांनी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपदासाठी मुख्यमंत्र्याकडे आग्रह धरल्याचे समोर येत आहे. यामुळे संभाजीराजे भोसले यांचे प्राधिकरणाचे अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. (Latest Political Marathi News)

Bharat Gogawale, Sambhajiraje
Kolhapur Politics: भाजपसोबत सत्तेत जाऊनही हसन मुश्रीफांची झाली अडचण; समरजितसिंह घाटगेंनी वाढवले टेन्शन

मराठा आरक्षणासाठीचे मोर्चे जोरात असताना, मराठा नेत्यांच्या राजकीय सोयीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोय केली होती. याचाच एक भाग म्हणुन छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्यात आले. यानंतर त्यांना रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले.

कोकण विभागाचे तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी शिवनेरी विकासाच्या धर्तीवर रायगड विकासाचा सुमारे ६०० कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार केला. या आराखड्याला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरणाचा दर्जा देत छत्रपती संभाजी महाराजांची रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

Bharat Gogawale, Sambhajiraje
NCP Vs Shivsena : पुन्हा अदिती तटकरे पालकमंत्री नकोच; शिंदे गटाने उपसले हत्यार

दरम्यान, रायगड विकासासाठीच्या ६०० कोटींच्या विकास प्रकल्पाबाबत स्थानिक आमदार म्हणून आपल्याला विश्‍वासात घेतले जात नसल्याची तक्रार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करत असल्याचे समजते. आता या प्राधिकरणाची जबाबदारी आपल्याकडे द्यावी, असा आग्रह गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांकडे धरल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी संभाजी महाराजांचे अध्यक्षपद धोक्यात आल्याची चर्चा आहे.

रायगड प्राधिकरणावर स्थानिक आमदाराची नियुक्ती असावी अशी भावना स्थानिक नागरिकांची असल्याचे मत आमदार भरत गोगावले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली. भरत गोगावले म्हणाले, "रायगड किल्ला माझ्या मतदारसंघात आहे. त्यामुळे रायगड किल्ल्याची जबाबदारी आमचाही आहे. रायगड प्राधिकरणात मी सभासदही नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आग्रही असण्याचा प्रश्नच नाही. मात्र स्थानिक लोकांना वाटते की आपला लोकप्रतिनिधी या प्राधिकारणात असावा. मी कधीही त्याबाबत आग्रह धरलेला नाही."

Bharat Gogawale, Sambhajiraje
Sharad Pawar News : राष्ट्रवादीवर अजित पवारांचा दावा; पण कार्यकारी समितीवर शरद पवारांचे वर्चस्व

संभाजी महाराजांवर भाजपा नाराज

संभाजी महाराजांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याबरोबरच रायगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद देऊनही त्यांचा विशेष फायदा झाला नसल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत झाले आहे. त्यामुळे संभाजी महाराजांपेक्षा पक्षातील किंवा सत्तेतील मित्रपक्षाच्या आमदाराकडे रायगड प्राधिकरणाची जबाबदारी देऊन त्यांनी खूष करण्याचे प्रयत्न असल्याचे समजते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com