Sanjay Pandey News : माजी पोलीस महासंचालक, घोटाळ्याचे आरोप, ईडीकडून अटक; आता संजय पांडे यांची नवी 'इनिंग' सुरू

Former Maharashtra DGP Sanjay Pande Join Congress : संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पांडे यांना ईडीने एनएसई स्नूपिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. IIT कानपूरचे पदवीधर असलेल्या पांडे यांनी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी म्हणून अनेक जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.
Sanjay Pandey News
Sanjay Pandey NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात महाविकास आघाडी सरकार काळात मुंबईचे पोलीस आयुक्तपद आणि त्यानंतर प्रभारी पोलिस महासंचालक पद सांभाळणारे डॅशिंग अधिकारी संजय पांडे यांनी अखेर आपली नवी इनिंग सुरू केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.ते आगामी काळात मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

संजय पांडे (Sanjay Pandey) हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.पांडे यांना ईडीने एनएसई स्नूपिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. IIT कानपूरचे पदवीधर असलेल्या पांडे यांनी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी म्हणून अनेक जबाबदार्‍या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

संजय पांडे यांनी खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.19)काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. लोकसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती. पण त्यात त्यांना यश आले नाही. गेल्या काही दिवसांपासून संजय पांडे राजकीय वाटचालीसाठी चाचपणी करत होते. नवा पक्ष, शिवसेना की काँग्रेस अशा अनेक पर्यायांचा त्यांच्याकडून विचार सुरू होता.

काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केल्यानंतर संजय पांडे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले,2004 पासून मी काँग्रेस पक्ष जॉईन करायच्या विचारात होतो.डरो मतला माझा पाठिंबा आहे.आम्ही सत्तेत आलो तर सर्वसामान्यांना घाबरायची गरज नाही.मी सेक्युलर विचार पाळणारा माणूस आहे.

Sanjay Pandey News
Abdul Sattar News : सत्तेसाठी अब्दुल सत्तार पुन्हा पक्ष बदलणार का ?

ईडी, सीबीआयचा धाक मी पण बघितला आहे. केंद्रीय तपासयंत्रणांचा मलाही त्रास झाला आहे. पण आपण सत्याबरोबर असल्याचेही पांडे यांनी यावेळी सांगितले. मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे. ⁠या संदर्भात पक्ष निर्णय घेईल. सीबीआयचा मी ही व्हिक्टीम आहे. ⁠या संदर्भात कोर्टात केस लढेल.⁠ ईडी याचा आणि पक्षप्रवेश याचा काहीही संबंध नाही असंही माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी स्पष्ट केले.

Sanjay Pandey News
BJP Assembly Candidates : भाजपच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होऊ शकते 50 उमेदवारांची घोषणा ?

पाच महिने तिहार जेलची हवा खाऊन आलेले संजय पांडे यांनी गेल्या महिन्यात प्रचाराला सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी कुठल्या पक्षाकडून की अपक्ष विधानसभा निवडणूक लढणार याबाबत स्पष्टता दिलेली नव्हती.

राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) अधिकारी व कर्मचाऱ्याचे फोन टॅप केल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह त्यांच्या आई संतोष पांडे व मुलगा अरमान पांडे यांच्यावर सीबीआयने नुकताच गुन्हा दाखल केला होता. सक्तवसुली संचालनालयानेही (ED) पांडे यांच्यावर मनी लाँर्डिंगचा गुन्हा दाखल केला होता.

संजय पांडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन 30 जून 2022 रोजी निवृत्त झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ईडीने त्यांना नोटीस पाठवली होती. निवृत्तीनंतर अटक होणारे संजय पांडे हे तिसरे मुंबई पोलीस आयुक्त होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com