Sanket Bawankule : संकेत बावनकुळेने बीफ खाल्लं? नव्या दाव्यानं खळबळ

nagpur audi crash case : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुपुत्राच्या ऑडीनं दुचाकीसह चारचाकी वाहनांना धडक दिली आहे. याबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
sanket bawankule.jpg
sanket bawankule.jpgsarkarnama
Published on
Updated on

नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुपुत्र संकेत बावनकुळे याच्या गाडीमुळे झालेल्या अपघात प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.

संकेत बावनकुळे आणि त्याच्या मित्रांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केलं, त्या बिल मध्ये बीफचा समावेश असल्याचा दावा खासदार राऊत यांनी केला आहे. मात्र, खासदार राऊत यांच्या दाव्यानंतर संकेत बावनकुळेने बीफ खाल्लं का? असा सवाल उपस्थित होत आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांचा सुपुत्र संकेत बावनकुळे याच्या भरघाव ऑडी कारने रविवार रात्री पाच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणाचाही जीव गेला नाही. तरी, एकजण जखमी झाला आहे. अपघानानंतर संकेतसह गाडीतील तिघेजण पळून गेले होते. त्यापैकी दोघांना पोलिसांना अटक केली होती. मात्र, संकेत बावनकुळेवर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नव्हती.

दरम्यान, कारचालकाने मद्य प्राशन केल्याचं तपासात उघड झालं आहे. तसेच, मंगळवारी संकतेची चौकशी करण्यात आली, तेव्हा, तो ऑडीमध्येच असल्याचे त्याने कबुल केलं असल्याची माहिती पोलिस आयुक्त राहुल मदने यांनी दिली.

sanket bawankule.jpg
Sanjay Raut On Ajit Pawar : अजितदादांना मुख्यमंत्री बनण्याचा हक्क; पहा संजय राऊत कोणाशी करताहेत तुलना

यातच खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केलेल्या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. "ऑडी कारमध्ये लाहोरी बारचे बिल मिळालं आहे. ते लाहोरी बारमधील बिल जनतेसमोर आणलं पाहिजे. त्या बिलात मद्याचा समावेश आहे. आम्हाला हिंदुत्व शिकवतात... मात्र, चिकन, मटन आणि त्याचबरोबर बीफ कटलेत याचाही बिलात समावेश आहे... आम्हाला हिंदुत्व शिकवतात... श्रावण आहे... गणपती आहे... अमुख आहे... हिंदुत्व आहे... बीफ खाऊन लोकांचे रस्त्यावर बळी घ्यायचे," असं म्हणत संजय राऊत भडकले.

sanket bawankule.jpg
Assembly Election 2024 : माळशिरसमधून 'तुतारी'च्या उमेदवारावर मोहिते-पाटलांकडून शिक्कामोर्तब, समोर राम सातपुते की अन्य कुणी?

"देवेंद्र फडणवीस अनिल देशमुख यांना अटक करायला निघाले आहेत. त्यांनी गृहमंत्री म्हणून काही निर्णय घेतले असतील. मात्र, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या पक्षातील एका नेत्याच्या मुलानं दहा गाड्या चिरडून, मद्य पिऊन, लोकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्याला तुम्ही अभय देताय? कुठे फेडाल हे पाप? हे भयंकर आहे," अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com