Sanjay Raut : मराठी माणसाला खतम करण्याचा प्रयत्न सुरू ; राऊतांचा अप्रत्यक्ष भाजपवर टिकास्त्र!

Sanjay Raut : मुंबईवर मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा नैसर्गिक हक्क आहे,
MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66 वा महापरिनिर्वाणदिन (Babasaheb Ambedkar Death Anniversary) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांनी अभिवादन केले. यावेळी आंबेडकर, संविधानाचा, या विषयाचा धागा पकडत राऊत यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.

संजय राऊत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राची दोन दैवतं आहेत. बाबासाहेबांना अभिवादन महासागर जमलेला आहे, आम्हीही त्यातले एक आहोत. फक्त आजच आंबेडकरांचं स्मरण आम्हाला होत नाही़. जेव्हा जेव्हा या देशामध्ये कायदा आणि संविधानाची पायमल्ली होते. सामान्यांवर अत्याचार होतो, तेव्हा या देशाचं संविधान आणि आंबेडकरांचं कार्य आम्हाला आठवत असतं आणि शिवसेना आंबेडककरांचं स्मरण नेहमी करत असते.

MP Sanjay Raut
उध्दव ठाकरेंकडून 'नेभळट सरकार' म्हणून टीकास्त्र; मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार,म्हणाले...

डॉ. बाबासाहेबांची आम्हाला आठवण आज प्रकर्षाने यासाठी येते की, देशात संविधानाची पायमल्ली सुरू आहे. आंबेडकरांच्या घटनेचा अपमान होताना आम्हाला दिसत आहे, म्हणून आंबेडकर आठवत आहेत. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला जातो. आंबेडकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात होते. प्रबोधनकार ठाकरे यांचे हात धरून ते या आंदोलनात आले होते. प्रबोधनकारांच्या सांगण्यावरून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात भाग घेतला होता, म्हणून आज प्रकर्षाने आंबेडकरांचे आज आम्हाला स्मरण होत आहे, असे राऊत म्हणाले.

MP Sanjay Raut
Surgana; आदिवासी पोहोचले गुजरातच्या तहसीलदारांकडे, आम्हाला गुजरातमध्ये घ्या!

मराठी माणसाला खतम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आंबेडकरांचं एक ऐतिहासिक विधान आहे. अशा प्रकारे मुंबईवर हल्ले सुरू राहिले तर मुंबई मराठी माणसाच्या हातात राहणार नाही. मुंबईवर मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा नैसर्गिक हक्क आहे, आंबेडकरांच्या या विधानाचे आम्हाला स्मरण होत आहे, असे आंबेडकर म्हणाले, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com