Sanjay Raut News : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहांचे प्रयत्न, फडणवीसांनी दिली साथ; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा

Nitin Gadkari : गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.', असं देखील राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.
 Narendra Modi Amit Shah  Nitin Gadkar
Narendra Modi Amit Shah Nitin Gadkarsarkarnama

Lok Sabha Election : नागपूर लोकसभा निवडणूक ही पहिल्या टप्प्यात झाली. ही निवडणूक एकतर्फी होवून नितीन गडकरी सहज निवडून येतील, अशी सुरुवातील हवा होती. मात्र, नंतर चित्र काहीसे पालटले. काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे हे नितीन गडकरींना चांगली टक्कर देत असल्याचे दिसले. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नागपुरच्या जागेवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या 'सामना'तील लेखाच्या माध्यमातून केला आहे.

'4 जूननंतर भाजपात मोदी-शहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी Nitin Gadkari यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले.', असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस Devendra Fadnavis यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात.', असं देखील राऊत यांनी लेखात म्हटलं आहे.

 Narendra Modi Amit Shah  Nitin Gadkar
Soniya Duhan News : शरद पवारांच्या NCP ला धक्का बसण्याची शक्यता, सोनिया दुहान अजित पवार गटाच्या मार्गावर?

30 जागा युपीत गमावणार

जे गडकरींचे तेच योगींचे. अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचाही परिणाम 4 जूनला दिसेल, असं राऊत यांनी लेखात नमूद केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लष्करप्रमुख मोदींचे ऐकणार नाही

इंडिया आघाडी 300 च्या आसपास जागा मिळवेल. मोदी-शहांचा पराभव झाला तर तो ते सहज सत्ता सोडतील का, एखाद्या हुकूमशहाप्रमाणे ते सत्ता सोडण्यास नकार देतील असे बोलले जाते ते खरे नाही. 4 जूनच्या दुपारनंतर देशात राज्यघटनेला उभारी मिळेल. लष्करप्रमुख, पोलीस, प्रशासन यांचे प्रमुख मोदी-शहांचे काहीएक ऐकणार नाहीत. या सर्व संस्था गुलामीच्या बेडय़ा तोडून टाकतील. “ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता, असे देखी राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

 Narendra Modi Amit Shah  Nitin Gadkar
Hiraman Khoskar: शांत बसा...; काँग्रेस आमदाराचा मुख्यमंत्र्यांबाबत मोठा गौप्यस्फोट; पण, मी आघाडीचा धर्म पाळला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com