Sanjay Raut : "पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच नेहरू टोपी घालतील..." ठाकरेंच्या शिलेदाराने भाजपला पुन्हा डिवचलं

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाव घेऊन टीका करावी. मात्र त्यांच्यात ती हिंमत नाही, असे राऊतांनी म्हटलं आहे.
Narendra Modi Uddhav Thackeray
Narendra Modi Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Aug : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी यांनी थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाव घेऊन टीका करावी. मात्र त्यांच्यात ती हिंमत नाही, असे राऊतांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्य दिन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नारा दिला. पंतप्रधानांचा हा नारा चर्चेचा विषय आहे. या संदर्भात बोलताना संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. शिवाय यावेळी त्यांनी मोदींना आव्हान देखील दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठे टॅरिफ लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे. स्वदेशीचा नारा हा काँग्रेसचा नारा आहे. स्वातंत्र्यपूर्व लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेसने स्वदेशीचा अवलंब केला होता. याचा पंतप्रधान मोदींना विसर पडला की काय? असा प्रश्न राऊतांनी केला.

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचे धोरण आणि घोषणा दोन्हींचा स्वीकार केल्याचे हे प्रतीक आहे. लवकरच पंतप्रधान मोदी नेहरू टोपी घालून भाषण करताना दिसतील. त्यावेळी आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल, असा चिमटा ही राऊत यांनी घेतला.

Narendra Modi Uddhav Thackeray
BEST Patpedhi election : राज-उद्धव एकत्रित लढवत असलेल्या 'बेस्ट'च्या संचालकांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी; ठाकरेंची कोंडी करण्याचा प्लॅन? चर्चांना उधाण

पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना टीका केली. आव्हान दिले, मात्र कोणाचेही नाव घेतले नाही, असे राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्याकडे नाव घेऊन आव्हान किंवा टीका करण्याचे धाडस नाही. पंतप्रधान मोदी यांनी तसे धाडस दाखवावे. आज खरे तर त्याचीच गरज होती.

उठ सूट पाकिस्तानवर टीका केली जाते. पाकिस्तानवर टीका करणे सोपे आहे. मात्र पाकिस्तान एकटा आहे का? पाकिस्तान मांगे चीन उभा आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी चीनवर टीका करायला हवी. पाकिस्तानच्या मागे डोनाल्ड ट्रम्प आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांना वाईट हाऊस मध्ये ट्रम्प मानाने भोजन देतात.

Narendra Modi Uddhav Thackeray
Mumbai Rain Landslide : मुंबईतील विक्रोळीत मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, झोपेतच बाप-लेकीवर काळाचा घाला

भारतीय लष्कर प्रमुखाला तसे निमंत्रण मिळाले आहे का? त्यामुळे पाकिस्तान ऐवजी खरी टीका चीन आणि ट्रम्प यांच्यावर करण्याची गरज आहे. चीनला पाकिस्तान मागे उभे राहू नका अशी समज देण्याची गरज आहे. पानिपत येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत मोहित कुमार या उमेदवाराने निवडणूक आयोगा विरोधात शेवटपर्यंत लढा दिला.

फेर मतमोजणीत पराभूत उमेदवार विजयी झाला. सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाची अब्रू उघड्यावर पडली. त्यापासून धडा घेण्याची गरज आहे. आपण पराभूत झाल्यावर केवळ निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर खडे फोडतो. आता खरे तर मोहित कुमार सारखा शेवटपर्यंत लढा देण्याची आवश्यकता आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com