
Pune News, 12 Feb : शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत (Rushiraj Sawant) यांच्या अपूर्ण बँकॉक दौऱ्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. ऋषिराज हे पुण्यातून गायब होताच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला.
त्यानंतर वडील तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी काही वेळातच ऋषिराज यांचं अपहरण झालं नसून तो मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता असं सांगितलं. मात्र, यांच्या या दौऱ्यावरून अनेक चर्चांना उधाण आलं आहे. अशातच ऋषिराज हे नेमके बँकॉकला कशासाठी निघाले होते याबाबतची माहिती त्यांनी स्वत: पोलिसांना दिली आहे.
व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकला निघालो होतो, असं त्यांनी चौकशीत सांगितल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. ऋषिराज (Rushiraj Sawant) यांचे अपहरण झाल्याच्या बातमीनंतर एकच खळबळ उडाली होती. एका माजी मंत्र्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये सुरू होत्या. मात्र काही वेळातच ऋषिराजचे अपहरण झाले नसून ते खासगी विमानाने ते बँकॉकला निघाल्याचे समोर आले.
त्यानंतर वडील तानाजी सावंत यांनी मोठी यंत्रणा कामाल लावत बँकॉकला निघालेले विमान पुण्याला परत फिरवले. दरम्यान, अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यामुळे पोलिसांनी ऋषिराजसह त्यांच्या दोन मित्रांची चौकशी सुरू केली. त्यामध्ये, मी व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकला जात होतो. मात्र मी नुकताच दुबईवरून परत आल्याने घरचे मला बँकॉकला जाऊ देणार नव्हते. त्यामुळे मी कोणाला न सांगता बँकॉकला निघाल्याचं ऋषिराज यांनी पोलिसांना सांगितलं.
तर या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी त्याच्याकडे पुन्हा चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ऋषिराज मागील आठवड्यात दुबईतून पुण्यात आले होते. त्यानंतर बँकॉकला जाण्यासाठी त्यांनी 'ग्लोबल फ्लाइट हॅडलिंग सर्व्हिसेस' कंपनीकडून खासगी विमान आरक्षित केलं. त्यासाठी 78 लाख 50 हजार भरले होते.
मात्र, ऋषिराज यांच्या बायकोचा मंगळवारी (10 फेब्रुवारी) वाढदिवस असतानाही त्यांनी बँकॉकला जाण्याचे नियोजन होते. त्यामुळे घरच्यांचे त्यांनी बँकॉकला जाऊ नये, असं मत होतं. त्यावरून कुटुंबियांमध्ये वाद देखील झाला आणि ते कोणालाही न सांगता मित्रांसोबत बँकॉकला निघाले होते. मात्र, त्यांचे वडील तानाजी सावंत यांनी यंत्रणांशी समन्वय साधून बँकॉकला निघालेले विमान परत पुण्याकडे फिरवले. मात्र, या अपहरणनाट्याची राज्यभरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.