मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाला आता शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाने ऑफर दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी "शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर त्यांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी, त्यांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवा," असेही आव्हान राऊत यांनी शिंदेंच्या नेतृत्वातील गटाला केले. (
शिवसेनेच्या या बदलेल्या भूमिकेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात गोळा आला आहे. या दोन्ही पक्षांनी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विकास आघाडी हे महाराष्ट्राचा विकास आणि कल्याणासाठी स्थापन झालेले सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही शेवट पर्यंत ठामपणे उभे आहोत, असे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
तर काँग्रेसनेही उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. मात्र त्याचवेळी राऊत यांनी भूमिका बदलल्याने काँग्रेस पुन्हा एकदा विचार करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळत आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या ताब्यातून सुटलेल्या २ आमदारांनी माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. "आम्हाला फसवून नेले,"असे या दोन आमदारांनी सांगितले. आमदार कैलास पाटील, आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या अपहरण आणि सुटकेची कहानी यावेळी सांगितली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.