Sanjay Raut On Sharad Pawar Resignation : महाविकास आघाडीवर काहीही परिणाम नाही, जिथे पवार तिथे राष्ट्रवादी; राऊत स्पष्टच बोलले..

Sharad Pawar Resigns Live Update : 'शिवसेना म्हणजे जसे ठाकरे तसे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार"
Sanjay Raut On Sharad Pawar :
Sanjay Raut On Sharad Pawar : Sarkarnama

Sharad Pawar Resigns Live Update:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षापदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती करीत आहेत. मात्र याबाबत अजूनही शरद पवार फेरविचार करणार का? याबाबत अद्यापही सकारात्मक माहिती पुढे आली नाही. मात्र पक्षातील कार्यकर्त्यांना भरून आले आहे.

Sanjay Raut On Sharad Pawar :
Sharad Pawar Retirement : शरद पवारांची पदावरुन पायउतार होण्याची घोषणा अन् वाय.बी चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांचा जनसागर

आता या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. "शरद पवार यांचा हा निर्णय अचानक घडून आले असले तरी, धक्कादायक असले तरी, अनपेक्षित काही नाही. निवृत्त व्हायचा निर्णयावर शरद पवार स्वत:च विश्लेषण करू शकतात. पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. अशाच प्रकारे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सुद्धा राजीनामा दिला होता. पण लोकमताचा आणि शिवसैनिकांचा निर्णय मान्य करत ते पुन्हा शिवसेनाप्रमुख झाले. असे निर्णय वेगवेगळ्या परिस्थितीत घेतले जात असतात."

Sanjay Raut On Sharad Pawar :
Sharad Pawar Resigns As NCP Chief : शरद पवारांनी निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी उपोषण; कार्यकर्ते भावूक..

"आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांचा बैठका सुरू आहेत. पण आमचा ही संपर्क आणि संवाद चालू आहे. पवारांच्या या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नाही. निर्विवाद नेतृत्व पवार करतात. शिवसेना म्हणजे जसे ठाकरे तसे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आहेत. जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असेही संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Sharad Pawar :
Sharad Pawar Retirement: "भाकरी फिरवण्याचे संकेत पण तवाच फिरवला, इतिहासाची पुनरावृत्ती.." ; राऊतांचं सूचक ट्वीट

दरम्यान, "पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालो असलो तरी, सार्वजनिक कार्यातून कुठेही दूर जाणार नाही. सात दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन, तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन," असेही शरद पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com