Srinivas Vanga: वनगा रडले, आता एकनाथ शिंदेही रडतील; पण उद्धव ठाकरे..! संजय राऊतांनी तोफ डागली

Sanjay Raut On Srinivas Vanga: आता पालघरमधून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानं त्यांना रडू कोसळलं. आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वनगा यांनी हे आत्महत्येच्या विचारात असल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी आणि आईने केला आहे.
Sanjay Raut On Srinivas Vanga.jpg
Sanjay Raut On Srinivas Vanga.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी एकीकडे उमेदवारांची घोषणा होत असतानाच नाराजांकडून बंडखोरीचं शस्त्रही उपसलं जात आहे. त्यामुळे बंडखोरांनाही थोपवण्याचं काम महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुरू आहे. यातच पालघरमध्येही जोरदार नाराजीनाट्य रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीत पालघरमधून यंदा श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्याऐवजी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना तिकीट जाहीर झालं आहे.

यामुळे उद्विग्न झालेले शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडले.तसेच उद्धव ठाकरे यांच्यासारख्या देव माणसाला सोडलं. त्यांच्यामुळे मी आमदार झालो, पण घातकी माणसांना साथ देऊन घात झाला’,अस म्हणाले आहेत. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वनगांना झापलंच शिवाय शिंदेंबाबतही खळबळजनक दावा केला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (ता.29) माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी श्रीनिवास वनगा यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, श्रीनिवास वनगा हे आमदार झालेत, ते काही एकनाथ शिंदे यांच्यामुळे नाही, उद्धव ठाकरेंमुळे आमदार झाले आहेत. पण हे महाशय सुरतला गेले, गुवाहाटीला गेलेत. गोव्याला गेलेत. त्यांना तिथे आम्ही नाचतानाही पाहिलं. तेव्हा त्या भागातील अनेकांना रडू कोसळलं होतं. काय हा आमदार? याला आम्ही निवडून दिलं होतं आणि आज आमच्याविरोधात तांडव करतोय असंही राऊतही यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, ही सर्व कर्माची फळं असतात,येत्या 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेंनाही (Eknath Shinde) रडू कोसळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तर शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या घरवापसीवर बोलताना पश्चाताप झाला आता घरी बसा,असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut On Srinivas Vanga.jpg
Shivsena Vs MNS : आमदार पाटलांना घेरताच, आमदार किणीकर यांच्या अडचणी 'मनसे' वाढवणार?

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये ऐतिहासिक फूट पडली होती. शिंदे यांनी बंड करत 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या नेत्यांमध्ये श्रीनिवास वनगा यांचा देखील समावेश होता. वनगा यांना 2019 मध्ये पालघर मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली होती. श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नम यांचा पराभव केला होता.

मात्र, आता पालघरमधून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापल्यानं त्यांना रडू कोसळलं. आपल्याला उमेदवारी मिळणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर वनगा यांनी हे आत्महत्येच्या विचारात असल्याचा खळबळजनक दावा त्यांच्या पत्नी आणि आईने केला आहे. तिकीट कापल्यानं श्रीनिवास वनगा यांना रडू यांना कोसळलं. मला चांगली संधी होती, मतदारसंघात मी काम केलं, विकासकामं केली. माझ्या वडिलांपासून मी केलेल्या प्रामाणिकपणाचं फळ आम्हाला हेच मिळालं का? प्रत्येकवेळी गावितला मिळाले, असे म्हणत श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com