Sanjay Patil Vs Sanjay Raut: संजय पाटलांविरोधात संजय राऊत मैदानात; थेट पोलिस आयुक्तांना पत्र! 'त्या' धमकीची गंभीर दखल

Sanjay Raut Sanjay Patil Death Threat: आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना खासदार संजय दिना पाटील यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणात आता थेट संजय राऊत यांची एन्ट्री झाली आहे. त्यांनी पोलिस आयुक्तांना या बाबत पत्र लिहिले आहे.
Sanjay Raut writes letter to police commissioner
Sanjay Raut writes letter to police commissionerSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Patil and Sanjay Raut dispute: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फुटीर खासदार संजय पाटील यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना जीवे मारण्याची धमकी दिली.

माझ्या नादाला लागू नका माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या, मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन नाहीतर हॉस्पिटल पाठवीन, अशी जाहीर धमकी संजय पाटील देत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

यासंदर्भात राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांना सविस्तर पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांची चौकशी करा, त्यांना अटक करा अशी मागणी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवल्या गेलेल्या ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. या पक्षांतरानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यसभेचे खासदार तथा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गद्दार खासदारांविरोधात आम्ही ऑपरेशन तुडवा राबवणार असल्याची धमकी दिली होती.

पोलीस बाजूला ठेवून या मग बघतो असा इशाराही दिला होता. त्याला फुटीर खासदारांकडूनही आव्हान दिले गेले होते. ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील यांनी बंदूक दाखवण्याचा इशारा करत ऑपरेशन तुडवा राबवण्याचे आवाहन करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला आव्हान दिले होते. यावरही संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी संजय पाटील यांना चॅलेंज देत आम्हाला बंदुकीची भाषा वापरायची नाही, असे म्हटले होते.

एकूणच शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या राज्याच्या विविध भागात संघर्ष आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान खासदार संजय पाटील यांच्या विरोधात मतदारसंघात शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी संजय पाटील यांनी दिलेल्या धमकीची गंभीर दखल घेत संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना सविस्तर पत्र लिहिले आहे.

Sanjay Raut writes letter to police commissioner
Maharashtra News Live Update : कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना गावगुंडांकडून मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पत्रात काय?

प्रिय श्रीदेवेन भारतीजी, जय महाराष्ट्र एका गंभीर बाबीकडे मी आपले लक्ष वेधत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. या फुटीविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत कमालीचा संताप असून मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

आंदोलन करणे, लोकप्रतिनिधी जाब विचारणे, हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे पण ईशान्य मुंबईतील सुधीर खासदार संजय पाटील यांनी आंदोलन करताना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

पाटील म्हणतात माझ्या नादाला लागू नका. माझ्या विरोधात आंदोलन करण्याच्या आधी जीवाचा विमा काढून घ्या, मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवीन नाहीतर हॉस्पिटल पाठवीन. धमकी देताना ते पुढे म्हणतात मी आधी पाच लोकांना ठार केले आहे.

ठार केलेले हे पाच लोक कोण? संजय पाटील यांनी त्यांना कधी व का ठार केले त्याचा तपास व्हावा, आरोपीने स्वतःच कबुली दिल्याने त्यांच्या विरोधात तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा, माझ्या विरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेल अशी ही धमकी संजय पाटील यांनी दिली आहे.

माननीय भारतीजी खासदाराकडून बॉम्ब टाकण्याची धमकी चिंताजनक आहे. हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरात बनवले असतील तर त्यांच्या घराची त्वरित झडती घ्यावी, त्या कामी दहशतवाद विरोधी पथकाची मदत घ्यावी. हे बॉम्ब त्यांना पुन्हा दहशतवादी टोळीकडून मिळाले असतील तर हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर मुद्दा मानावा लागेल व लगेच युएपीए खाली अटक होणे गरजेचे आहे.

...तर जबाबदारी संजय पाटलांची

त्यांची सर्व वक्तव्य दहशतवाद गुन्हेगारी कृत्यात सहभागी होण्याचे पुरावे आहेत. त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई व्हावी अन्यथा मला जनतेच्या सुरक्षेसाठी न्यायालयात दाद मागावी लागेल. खासदार पाटील यांच्या धमकीमुळे समाजात चिंतेचे वातावरण आहे.

या काळात एखाद्या राजकीय कार्यकर्त्यावर हल्ला झाला अथवा खून झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संजय पाटील यांच्यावर राहील, हे मी इथे खास नमूद करतो कळावे, असे देखील राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

पत्रकारांना धमकी

संजय दिना पाटील यांनी थेट पत्रकारांना देखील धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. माझ्या नादाला लागू नका, पोलिसांसमोर सांगतो परत आलात तर मारुन पाठवेन. तुम्हाला करायचंय ते करा, पोलिस कमिशनरकडे तक्रार करा, असे ते म्हणाले.

Sanjay Raut writes letter to police commissioner
Shivsena MP Split: उद्धव ठाकरेंच्या बंडखोर 6 खासदारांचा वेगळा गट,'कॅप्टन'ही ठरला? पोलिस पुरवणार थेट 'वाय प्लस' सुरक्षा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com