Sanjay Raut On Kirit Somaiya: संजय राऊतांचा सोमय्यांवर निशाणा; म्हणाले, "आपल्या कर्माने मरणार त्याला...."

Sanjay Raut Vs Kirit Somaiya : सोमय्या-राऊत यांच्यात रंगणार नवा सामना
Kirit Somaiya, Sanjay Raut
Kirit Somaiya, Sanjay RautSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut Warns Somaiya On Viral Video : विरोधकांचे घोटाळे बाहेर काढून माध्यमांपुढे मांडून त्यांना तुरुंगात पाठवलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओचा तपशील उकरून काढत सोमय्यांनी केलेल्या आरोपांचा हिशेबच चुकता करण्याचा इरादा शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. 'जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका' अशा शब्दात राऊतांनी सोमय्यांना इशाराच दिला. या मुद्द्यावरून सोमय्या-राऊत यांच्यात नवा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Political News)

Kirit Somaiya, Sanjay Raut
Maharashtra Monsoon Session : मुख्यमंत्र्यांकडील खातं शंभूराज देसाईंकडं आलं अन्‌ शेलार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरातांनी घेरलं...

किरीट सोमय्यांबाबत एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दिसतात. परिणामी विरोधकांवर घोटाळ्यांचे आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करणारे सोमय्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर राज्यातून जोरदार टीका होऊ लागल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी या व्हिडिओप्रकरणी सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.

या प्रकरणात सोमय्यांचा बुरखा टराटरा फाडून त्यांना धडा शिकवण्याची मोहीम संजय राऊतांनी उघडली आहे. राऊत म्हणाले, "जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका, असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब सांगायचे. आता नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे."

Kirit Somaiya, Sanjay Raut
Vaibhav Pichad on Kiran Lahamate: लहामटेंच्या भविष्यात काय लिहिलयं माहीत नाही; पिचडांचे सूचक विधान

व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर किरीट सोमय्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिडिओप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. "मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी," अशी विनंती किरीट सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.