Sanjay Raut News : हक्कभंगाचं प्रकरण तापलं; संजय राऊतांच्या अडचणी वाढणार

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर विधीमंडळाने ४८ तासांत लेखी म्हणणे मांडण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावली
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. विधानसभा सचिवांनी १ मार्चला नोटीस जारी करत त्यांना ४८ तासांची मुदत दिली होती. ही मुदत उलटून आता बरेच दिवस लोटले आहे. मात्र अद्यापही संजय राऊत यांनी उत्तर दिलं नाही. या प्रकरणी आता संजय राऊतांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसत आहेत.

खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील कारवाईचा मुद्दा केंद्र सरकारच्या कोर्टात जाणार, असल्याची माहिती समोर आली आहे. राऊतांकडून विधीमंडळास हक्कभंग नोटीसला लेखी खुलासा दिलाच नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून हे प्रकरण आजच विशेष अधिकार समितीकडे वर्ग होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. समिती संबंधित प्रकरण राज्यसभेच्या विशेष अधिकार समितीकडे पाठवणार आहे. राज्यसभेचा मान राखण्यासाठी प्रकरण केंद्राकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच राऊत यांना पुन्हा म्हणणं मांडायला वेळ द्यायचा की नाही, हे राज्यसभा समिती ठरवणार आहे.

Sanjay Raut
Internation Womens Day: 'या' आहेत भारतीय राजकारणातील सर्वाधिक शक्तीशाली महिला

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर विधीमंडळाने ४८ तासांत लेखी म्हणणे मांडण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावली. मात्र, त्या हक्कभंग नोटीसला राऊतांकडून अद्याप काहीही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना विधिमंडळाने ४८ तासांमध्ये आपलं म्हणणं लेखी मांडण्याची नोटीस दिली होती. शुक्रवारी संध्याकाळी राऊतांची खुलासा सादर करण्याची मुदत होती. मात्र, आता मुदत संपली आहे तरी देखील त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता विधिमंडळाकडून संजय राऊत यांच्याविरोधातील पुढील कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच विधीमंडळाकडून राऊतांना स्मरण पत्र पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com