Sanjay Raut Tweet: सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचे सूचक ट्विट; 'काय झाडी ,काय डोंगर...'

Sanjay Raut on Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांचे सरकार कोसळेल असा दावा महाविकास आघाडीचे अनेक नेते करत आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Tweet :  राज्याच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Poltical Crisis) सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात आज जाहीर होत आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचे ट्विट केलं आहे. "काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!'' असं सूचक ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. (Supreme Court Final Decision on Shivsena Case Today)

दरम्यान, निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतसे ठाकरे गट आणि शिंदे गटाची धाकधुक वाढली आहे. गेल्या वर्षी जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड केले. बंडखोर आमदारांविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा उपसभापतींकडे अर्ज दाखल केला होता. मात्र, उपराष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थगितीची मागणी केली होती. (Maharashtra Politics)

Sanjay Raut
Supreme Court Final Decision : आज फैसला : ठाकरे गट-शिंदे गटाची धाकधुक वाढली..; आत्तापर्यंत काय घडलं, सविस्तर वाचा

सुप्रीम कोर्टात सुमारे 9 महिने चाललेल्या प्रदीर्घ सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता. शिवसेनेच्या सोळा बंडखोर आमदारांच्या निलंबनावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल येणार आहे.

Edited By- Anuradha Dhwade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com