
Mumbai News : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी महायुती सरकारबाबत एक धक्कादायक विधान केले होते. यावेळी त्यांनी प्रसिध्द केलेल्या एका पत्रकाद्वारे महायुती सरकार 'मराठा, ओबीसी, धनगर यांच्या आरक्षणासह बहुजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही'असं म्हटलं होतं.
ते खरंतर दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे. तरीही, अशाप्रकारचं विधान येत त्यांच्याकडून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.तसेच चव्हाण यांचे हे विधान म्हणजे महायुती सरकारला घरचा आहेरच मानला गेला होता.त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने कडक भूमिका घेतली आहे.चव्हाण यांची थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी 15 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे, असे असताना आमदार चव्हाण यांनी जाणीवपूर्वक शिस्तभंग केलेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम जाहीर करताच सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत प्रसिद्धि पत्रक काढले होते. त्यात त्यांनी बहुजनांचे प्रश्न सोडवण्यात महायुती सरकार अपयशी ठरल्याचा चव्हाण यांनी आरोप केला होता.
आमदार सतीश चव्हाणांच्या पत्राची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी चांगलीच दखल घेतली होती., आमदार चव्हाण यांच्यावर दोनच दिवसांत ‘राजकीय’ कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता सतीश चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.
निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रम जाहीर करताच सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत प्रसिद्धि पत्रक काढले होते. त्यात त्यांनी बहुजनांचे प्रश्न सोडवण्यात महायुती सरकार अपयशी ठरल्याचा चव्हाण यांनी आरोप केला होता.
पक्षातून हकालपट्टीची कारवाई होताच सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून `तुतारी` हाती घेऊन गंगापूर-खुलताबाद मधून लढण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांची ही खेळी उलटवण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी कामाला लागले असून त्यांनी सतीश चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाला कडाडून विरोध सुरू केला आहे.
चव्हाण यांना पक्षात घेतले, गंगापूरचे तिकीटही दिले तर आम्ही बंडखोरी करू, असा थेट इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. आमदार चव्हाण यांना जिल्हाभरातून विरोध होत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.