Mumbai News, 12 Oct : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी शुक्रवारी (ता.11) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
अशातच शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सयाजी शिंदेंवर निशाणा साधला आहे. "सयाजी शिंदे आता खलनायकी विचारधारेसोबत ते गेले, त्यांनी गुलीगत धोका दिला", अशा शब्दात त्यांनी शिंदेंना डिवचलं. शिवाय त्यांनी शिंदेंचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
सुषमा अंधारेंच्या (Sushma Andhare) याच टीकेला आता सयाजी शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मी सुषमा अंधारेंना विचारून निर्णय घेत नाही. मला जे माझे निर्णय वाटले ते मी घेतले. त्यांना ते चुकीचं वाटलं तर त्यांना धन्यवाद," असं ते म्हणाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करताना सयाजी शिंदे म्हणाले, "मी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. नेते, व्हीलन म्हणून काम केलं आहे. आता नव्या भूमिकेत आलोय. सिस्टीममध्ये जाऊनच काम करावं लागेल हे माझ्या लक्षात आल्यामुळे मी प्रवेशचा निर्णय घेतला. मी पाचशे सहाशे सिनेमे केल्यामुळे आता काही अडचण नाही. त्यामुळे राजकारणात येऊन काही मिळवायच नाही. चांगल काम करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे."
तर सयाजी शिंदेंच्या पक्षप्रवेशावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "कायम खलनायकाची भूमिका करणारे सयाजी शिंदे आमच्यासाठी नायक होते. मात्र, आता खलनायकी विचारधारेसोबत ते गेले, त्यांनी गुलीगत धोका दिला." अंधारेच्या याच टीकेला सयाजी शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं.
ते म्हणाले, "मी सुषमा अंधारेंना विचारून निर्णय घेत नाही. मला वाटते ते निर्णय ते मी घेतले. त्यांना ते चुकीचं वाटलं असेल तर त्यांना धन्यवाद. सध्या खूप जण प्रतिक्रिया देत आहेत, आता या सगळ्यांवर मी प्रतिक्रिया द्यायला हवी असं काही नाही.
मला जी भूमिका पटली ती मी घेतली आता काही जणांना ती खलनायकी वाटत असेल त्याकडे मी दुर्लक्ष करणार आहे. यात न पडलेलं बरं, वयाची पासष्टी आली आहे. आतापर्यंतचे माझे निर्णय मीच घेतले आहेत, मी घेतलेला निर्णय योग्य आहे हे तुम्हा सर्वांना लवकरच कळेल."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.