kalyan News : कल्याण पूर्वेत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली आहे. एका घरातून अल्पवयीन मुलीचा आरडाओरडा ऐकू येत असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी घरात जाऊन पाहिले असता घरात रक्त पसरलेलं त्यांना दिसले.
तेथील लोकांनी याबाबत तात्काळ कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अख्तर मणियार (वय ६०) आणि सलीम शेख (वय ६२) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करत असून, सलीम हा रिक्षाचालक आहे. सदर पिडीत मुलगी ही गरीब घरातील असल्याची माहिती समोर आलो आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. कल्याण मध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभा गायकवाड यांना घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भेट देऊन सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्याशी चर्चा केली. या प्रकरणातील आरोपींवर पोस्कोसह संबंधित कायद्यांन्वये कठोर कारवाई करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, तसेच प्रकरणाचा सक्षमपणे पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना शहर अधिकारी प्रवक्ते ॲड. नीरज कुमार म्हणाले, "कल्याण पूर्व येथे अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून सरकारने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपींना जलदगती न्यायालयामार्फत कठोर शिक्षा देऊन पीडितेला तातडीने न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी देखील पोलिसांची भेट घेत असे कृत्य करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. कल्याण पूर्व येथे अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे. अशा नाराधमांना भर चौकात मारलं पाहिजे असा संताप व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.