प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा दणका पण लगेच पोलिसांकडून अटक नाही

विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत.
Pravin Darekar
Pravin DarekarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) हे अडचणीत आले आहेत. दरेकरांच्या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, न्यायालयाने दरेकरांना दिलासाही दिला आहे. त्यांना उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 29 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण कायम ठेवले आहे. यामुळे दरेकरांची अटक तूर्तास टळली आहे. (Pravin Darekar News)

मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) दिलासा न मिळाल्याने दरेकरांना अटक होण्याची शक्यता आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची दरेकर यांची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर दरेकरांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेवर आज न्यायालयाने फैसला सुनावला. न्यायालयाने दरेकरांचा अटकपूर्जाव जामीन अर्ज फेटाळला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी 29 मार्चपर्यंत अटकेपासूनचे संरक्षण कायम राहणार आहे.

Pravin Darekar
राज्यपाल अडचणीत! अखेर सीबीआय चौकशी लागली मागे

मुंबै बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर अडचणीत आले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून अर्ज भरला होता. याला आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यात आली होती. सहकार विभागाने याची चौकशी करुन दरेकरांना अपात्र ठरवले होते. मजूर म्हणून प्रवीण दरेकर हे सदस्यत्वाला अपात्र असल्याचे सहकार विभागाने म्हटले होते.

Pravin Darekar
'ईडी'च्या कारवाईमागील कारण शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनीच केलं उघड

कामगार असल्याचा दावा करून दरेकर हे 1999 मध्ये कामगार सहकारी संस्थेचे सदस्य झाले. त्यांनी 2016 मध्ये विधान परिषद निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 2.3 कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यांच्याकडे 2.5 लाख रुपयांच्या मासिक उत्पन्नासह 91 लाख रुपयांची रोकड होती. यावरून ते मजूर नसल्याचे दिसून येते, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दरेकरांनी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com