Eknath Shinde : महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे सात ते आठ लोकांचा मृत्यू : मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

Mumbai News : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde News : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

हा सोहळा नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर दिमाखात पार पडला. या पुरस्कारासाठी लाखो लोक उपस्थित होते. यामध्ये अनेक ज्येष्ठ लोकही उपस्थित होते. कार्यक्रम भर दुपारी असल्यामुळे अनेक जणांना यावेळी उष्माघाताचा त्रास झाला. यानंतर अनेक नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Eknath Shinde News
Maharashtra Bhushan Award: राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मात्र, त्यामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. अजूनही अनेक जण रुग्णालयात दाखल आहेत. त्यामध्ये अनेक जण गंभीर असल्याचीही माहिती मिळत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमजीएम रुग्णालयाला भेट दिली. यानंतर त्यांनी काही श्री सेवकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आजच्या कार्यक्रमात जे श्री सेवक आले होते त्यापैकी काहींना सनस्ट्रोकचा त्रास झाला. अत्यंत दुःखद घटना आहे. मनाला वेदना देणारी आहे. यात सात ते आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Eknath Shinde News
Amit Shah News : ''समाजसेवेचा संस्कार तीन पिढ्यांत राहतो,हे मी...''; अमित शाह यांचे धर्माधिकारींविषयी गौरवौद्गार

मृतांमध्ये महिला भगिनी आणि पुरुषांचाही सहभाग आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. चांगल्यात चांगले उपचार मिळतील याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. सर्व रुग्णांच्या उपचाराचा खर्च शासनाकडून करण्यात येईल. पनवेल महापालिकेचा उपयुक्त दर्जाचा अधिकारी कॉर्डीनेशन करेल. नातेवाईक आणि रुग्णांची गैरसोय होणार नाही याबाबत सूचना दिल्या आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com