Sharad Pawar Death Threat: शरद पवारांना धमकी देणारा कोण?; 'धर्मनिरपेक्षतेचा द्वेष करतो..'

Sharad Pawar Death Threat : "मी भाजपचा कार्यकर्ता' असा उल्लेख
Sharad Pawar Death Threat :
Sharad Pawar Death Threat : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. सौरभ पिंपळकर (Sourabh Pimalkar) नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर ही धमकी देण्यात आलेली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar Death Threat :
Sharad Pawar On Pune Loksabha : पुणे लोकसभेवर अजित पवारांचा दावा, तर शरद पवार म्हणाले...

धमकी देणारा कोण?

शरद पवारांना सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर आकाउंटवरून धमकी देण्यात आली आहे. पिंपरकरच्या ट्विटर बायोमधे मी भाजप कार्यकर्ता आहे, असा उल्लेख केलेला आहे. यामध्ये पुढे 'मला धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार आहे" असं लिहीलेलं आहे. अमरावती येथील लोकशन या हँडलवर आहे. दरम्यान यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (Sharad Pawar Death Threat)

Person Who Threat Sharad Pawar
Person Who Threat Sharad Pawar Twitter

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. धमकीचं ट्वीट ज्या अकाउंटवरून केले आहे, त्यावर मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मिटकरी म्हणाले की, याचा अर्थ स्पष्ट आहे की, यांच्या तपशीलात गेलो तर हेच आरोपी सापडतील. भाजपकडूनच हे करण्यात आलं आहे.अशा गल्लीबोळातील गुंडांना घाबरणारा आमचा पक्ष नाही, असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com