Pune Loksabha Seat : पुणे लोकसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे होत आहेत. दोन्ही पक्षांमध्ये पुणेच्या जागेवरून कलगीतुरा रंगत आहे. गिरीश बापट यांचं निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या पुणे लाकसभेवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला होता. यानंतर काँग्रेसकडून माजी मंत्री विजय वडेट्टीवर यांनी अजित पवारांनी उत्तर दिलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
अजित पवारांनी काय म्हंटलं होतं?
अजित पवारांनी म्हणाले होते की, "आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी राहिला आहे. यामुळे पुण्याच्या जागेवर पोटनिवडणूक लागणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, पोटनिवडणूक लागणारच असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद जास्त आहे, पुण्याची जागा लढवायला आपण इच्छुक आहोत, असे ते म्हणाले.
“सद्य परिस्थिती पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर ताकद जास्त आहे. महापालिकेत आम्ही चांगली ताकद दाखवली. या ठिकाणी आमचे ४० नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे दहाच नगरसेवक होते. शहरामध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदारही आहेत. आता ज्यांची ताकद जास्त आहे , त्यांना ती जागा लढवावी,” असेही अजित पवार म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
पुण्याच्या जागेवर दावे प्रतिदावे होत असताना, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केले आहे. या मुद्द्यावर शरद पवार यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आला.
यावर पवार म्हणाले की, “ठिक आहे पाहूया, जे योग्य आहे ते बघूया. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून, यावर योग्य तो मार्ग काढू. यात काळजी करण्याचं काही एक कारण नाही. अशी मागण्याआणि दावा सगळेच पक्ष करत राहतात. पण, त्या जागी शेवटी कोण प्रभावीपणे लढत देवून विजय मिळवतो, ते पाहावं लागेल.” असे शरद पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.