NCP Working President: राष्ट्रवादीच्या नव्या पदाधिकाऱ्यांना शरद पवारांनी दिला 'हा' सल्ला

Sharad Pawar News: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या नव्या जबाबदाऱ्या का देण्यात आल्या? याची माहिती देत नव्या नियुक्त्या करण्यात आलेल्यांनाही सल्ला दिला आहे.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या नव्या जबाबदाऱ्या का देण्यात आल्या? याची माहिती देत नव्या नियुक्त्या करण्यात आलेल्यांनाही सल्ला दिला आहे.

"पक्षाची नवी जबाबदारी मिळालेल्या सहकाऱ्यांनी महिन्यातले किमान सात दिवस दिल्लीत राहावं. त्याबरोबरच ज्या राज्याची जबाबदारी देण्यात आली त्या राज्यात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करवा", असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

Sharad Pawar News
Sharad Pawar News : अजितदादांच्या नाराजीवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, "एक टक्काही... "

पवार म्हणाले, "राज्याच्या बाहेर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे पक्षातील सहकाऱ्यांना काही नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय असून चर्चेतून सहकाऱ्यांना ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे", असं त्यांनी सांगितलं.

"आगामी निवडणुकांना एक वर्ष शिल्लक असून आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी पोहचू शकत नाही. तसेच एक कार्यकारी अध्यक्ष देखील एकाचवेळी सर्व ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला", असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

आगामी लोकसभा निवडणुसाठी विरोधकांच्या रणनितीबाबत देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. तसेच यापुढे आता कुठल्या-कुठल्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका लढवता येतील, यासाठी आम्ही चाचपणी करणार असल्याचंही सांगितलं.

Sharad Pawar News
NCP Working President: दोन कार्यकारी अध्यक्ष का करण्यात आले?; पवारांनी सांगितलं कारण...

ते पुढे म्हणाले,"सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा, महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्या इतर राज्यातील प्रश्न हाताळतील. तसेच त्यांच्याकडे लोकसभेत प्रश्न मांडण्याची जबाबदारीही देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली. याबरोबरच अजून काही सहकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, येत्या 23 जूनला पटणामध्ये विरोधी पक्षांची बैठक आहे. आगामी निवडणुकीमध्ये इतर पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीत आम्ही चर्चा करू. भाजपची ताकद जास्त असणाऱ्या ठिकाणी विरोधकांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com