Sharad Pawar NCP Crisis : निवडणूक आयोगाचा निर्णय; शरद पवार उचलणार मोठं पाऊल, दिल्लीत हालचाली

Election Commission of India : शरद पवार गटास आपला पक्ष आणि चिन्ह ठरवण्यासाठी ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्याची मुदत
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह दिले. या निर्णयानंतर अजित पवार गटात जल्लोष साजरा केला जात आहे. तर पुढील रणनीती आखण्यासाठी शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. निकाल विरोधात जातच दिल्लीत शरद पवार गटाच्या वकिलांची बैठकी सुरू झालेली आहे. त्यामुळे उद्या सकाळी शरद पवार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधीमंडळातील बहुमत लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) दिले आहे. यावेळीच आयोगाने शरद पवारांना विशेष सवलतही दिली आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पवार यांना त्यांच्या नवीन राजकीय पक्ष निर्मिती करण्यासाठी आवधी दिला आहे.शरद पवार गटाने आपला पक्ष आणि चिन्ह ठरवण्यासाठी ७ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले.

Sharad Pawar
Rohit Pawar On NCP Crisis : केंद्रातील महाशक्तीने पक्ष बळकावला; रोहित पवार भडकले

निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शरद पवार (Sharad pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रीया सुळे यांनी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे सांगितले. शरद पवारांनी पक्ष स्थापन केला, तो वाढवला. ज्यांना राजकारणात आणले त्यांनीच पवारांना धोका देत पक्ष पळवला. या अन्यायाविरोधात कोर्टात जाणार आहोत, असे सुळे म्हणाल्या आहेत. त्यानंतर आात दिल्लीत शरद पवार गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलांची बैठक सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, जयंत पाटलांनी शरद गोविंदराव पवार हे आमच्या पक्षाचे नाव असून त्यांनी शरद पवार यांचा फोटो असलेल्या चिन्हही सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तसेच शरद पवार गटाकडून शरद गोविंदराव पवार हाच आमचा पक्ष ही मोहीम राबवली जात आहे. आता निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाऊन आव्हान देणार असल्याची माहिती आहे. त्यानुसार दिल्लातील सुरू असेलल्या बैठकीत काय निर्णय होतो, हे उद्या सकाळीच स्पष्ट होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar
Devendra Fadnavis On NCP : 'आमच्या अजितदादांना पक्ष अन् घड्याळ...'; फडणवीसांकडून अभिनंदन!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com