Sharad Pawar News : शिरूरमधून कोल्हे, साताऱ्यातून पाटील यांना पुन्हा संधी ?; पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी

Sharad Pawar Meeting On Lok Sabha Seat : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कंबर कसली असून, जोरदार तयारी सुरू केली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar NCP News : आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी उमेदवाराची चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे.

Sharad Pawar
Pankaja Munde News : परळी मतदारसंघावरील दावा भाजपने सोडला नाही; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मुंबईत त्यासाठी १८ आणि १९ ऑक्टोबरला आढावा बैठक होत आहे. आणि त्यामध्ये आढावा घेतला जाणार आहे. यामध्ये शिरूरमधून खासदार अमोल कोल्हे, तर सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार (ता. १८) व शुक्रवारी (ता. १९) याबाबत बैठका होत आहेत. गुरुवारी कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, शिरूर, सातारा आणि माढा या मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी दिंडोरी, नगर, हिंगोली, वर्धा, अमरावती, बीड, भिवंडी, जालना या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्या ठिकाणची सद्यःस्थिती कार्यकर्त्यांकडून जाणून घेत कुठल्या ठिकाणी जागा जिंकण्याची संधी मिळणार, या जागांवर येत्या काळात दावा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघामधून खासदार अमोल कोल्हे यांना, तर सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संधी दिली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या दोन्ही नावावर बैठकीत काय खलबतं होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Sharad Pawar
Mumbai Political News : शरद पवारांची यशस्वी खेळी; शिंदेंचा बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com