MCA Election : शरद पवारांची फिल्डिंग पट्टशिष्यासाठी की ठाकरेंच्या शिलेदारासाठी?

Sharad Pawar Meet Devendra Fadnavis : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, जितेंद्र आव्हाड की मिलिंद नार्वेकर यांना समर्थन यावर चर्चा रंगली आहे.
Sharad Pawar-Devendra Fadnavis
Sharad Pawar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on
  1. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीत राजकीय चुरस:
    12 नोव्हेंबरला होणाऱ्या एमसीए निवडणुकीसाठी शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते थेट रिंगणात उतरले असून अध्यक्षपदासाठी मोठी लढत अपेक्षित आहे.

  2. अध्यक्षपदासाठी दिग्गज स्पर्धक:
    अजिंक्य नाईक, मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, विहंग सरनाईक आणि डायना एडूलजी यांच्यात अध्यक्षपदाची चुरस आहे, ज्यात राजकारणी आणि माजी खेळाडू दोघेही सामील आहेत.

  3. शरद पवारांचा निर्णायक प्रभाव:
    शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने, ते कोणाला पाठिंबा देतात यावरच विजयानिर्णय होणार, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

Mumbai, 10 November : मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक 12 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. विशेषतः अध्यक्षपदासाठी सर्वपक्षीय बडे नेते रिंगणात उतरल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. १० नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अध्यक्ष आणि इतर पदांबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. पवारांनी ही भेट त्यांचे पट्टशिष्य आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी घेतली आहे की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी घेतली, याची चर्चा रंगली आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे विहंग सरनाईक हे राजकीय नेते अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. याशिवाय भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडूलजी यांनीही एमसीएच्या अध्यक्षपदासाठी रस दाखवला आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी राजकीय नेत्यांबरोबरच माजी खेळाडूही मैदानात उतरले आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते आशिष शेलार यांचा गट प्रबळ मानला जातो. मागील निवडणुकीत शरद पवार गट आणि भाजपचा गट एकत्र आला होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, दुर्दैवाने न्यूयॉर्कमध्ये त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, त्यामुळे त्यांच्या जागी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना संधी मिळाली होती.

भाजप आमदार प्रसाद लाड, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या खास मर्जीतील आहेत. दुसरीकडे ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही अध्यक्षपदासाठी शड्डू ठोकला आहे. त्यांनी अध्यक्षपदाबरोबरच उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार, जॉईंट सेक्रेटरी अशा एकूण सहा पदांसाठी मैदानात उतरले आहेत. नार्वेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो वापरून प्रचार सुरू केला आहे, त्यामुळे प्रचारात रंगत आली आहे.

नार्वेकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट असोसिएशनचे (आयसीसी) अध्यक्ष जय शहा यांची मदत मिळावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्षपदाचा अर्ज भरण्यापूर्वी नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून शरद पवार यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांना फोन केला होता, त्यामुळे नार्वेकर यांच्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

Sharad Pawar-Devendra Fadnavis
Pandharpur Politic's : पंढरपुरात परिचारकविरोधी आघाडीचा उमेदवार ठरला; भालकेंसाठी अभिजीत पाटलांचे पवारांकडे लॉबिंग!

मिलिंद नार्वेकर यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अर्ज भरला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये पवारांचा गड प्रबळ मानला जातो. त्यामुळे शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फिल्डिंग लावली की उद्धव ठाकरेंच्या शिलेदारासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेतली, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची आज शेवटची तारीख असून भाजप आणि शरद पवार ज्यांना पाठिंबा देतील तो अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होणार आहे, त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत मुलाला मदत व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन भेट घेतली होती. आता तेही अध्यक्षपदाच्या शर्यत उतरल्याने मोठी चुरस बघायला मिळत आहे.

Sharad Pawar-Devendra Fadnavis
Pune Politic's : शरद पवारांच्या घनिष्ठ मित्राच्या घरात फूट; माजी खासदार पुत्राने धरला अजितदादांच्या राष्ट्रवादीचा रस्ता

Q1: मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक कधी आहे?
A1: 12 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे.

Q2: अध्यक्षपदासाठी कोण-कोण इच्छुक आहेत?
A2: मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, अजिंक्य नाईक, विहंग सरनाईक आणि डायना एडूलजी.

Q3: शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट कशासाठी झाली?
A3: एमसीए निवडणुकीतील उमेदवार आणि पाठिंब्याबाबत चर्चा करण्यासाठी.

Q4: निवडणुकीत कोणाचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे?
A4: शरद पवार आणि भाजपचा पाठिंबा मिळालेला उमेदवार विजयी ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com