Mangeshkar Hospital Case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात 'ससून'चा अहवाल सादर! भिसे कुटुंबीय की मंगेशकर रुग्णालय दोषी?

Tanisha Bhise Death Case Sassoon Report : ससून रुग्णालयाच्या वतीने सहा डाॅक्टरांच्या टीमने या तनिषा भिसे प्रकरणाची सखोल चौकशी करत अहवाल तयार केला आहे. त्यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवाकांडे सादर केला आहे.
Dinanath Hospital
Dinanath HospitalSarkarnama
Published on
Updated on

Pune Police : गर्भवती तनिषा भिसे हिच्या उपचारासाठी दीनानाथ रुग्णालयाकडून 10 लाखांचे डिपाॅजिट मागण्यात आले तसेच वेळेत उपचार करण्यात न आल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी आरोग्य विभाग आणि धर्मादाय आयुक्त यांनी चौकशी केली आहे. त्यांचे चौकशी अहवाल देखील समोर आले आहेत. मात्र, ससून रुग्णालयाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्यांच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे की नाही हे ठरवले जाणार आहे.

ससून रुग्णालयाच्या वतीने सहा डाॅक्टरांच्या टीमने या प्रकरणाचा सखोल चौकशी करत अहवाल तयार केला आहे. त्यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण सचिवाकांडे सादर केला आहे. तसेच पुणे पोलिसांना देखील पोस्टाने हा अहवाल पाठवलेला आहे. विशेष म्हणजे या अहवाल पूर्णपणे गुप्त ठेवला गेलेला असून अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे भिसे कुटुंबीयांच्या आरोपात किती तथ्य आहे? हे देखील या अहवालातून कळणार आहे.

Dinanath Hospital
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंनी मानले अजितदादांचे आभार! ही फक्त एक घोषणा नाही, तर दिलेली ही संधी...

या अहवालामध्ये नेमके काय आहे? हे समोर आलेले नाही. तनिषा हिच्यावर उपचार करत असताना दीनानाथ रुग्णालयात हलगर्जीपणा झाला का? तिच्या मृत्यूला नेमके कोणते कारण कारणीभूत होते? यावर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे.

दरम्यान, 'सकाळ'ला ससूनचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.यल्लपा जाधव यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, ससूनच्या वैद्यकीय समितीने आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला आणि अलंकार पोलिसांच्या अहवाल सादर केला आहे. मात्र यातील निष्कर्ष काय नोंदवलेत ही बाब गोपनीय असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही.

Dinanath Hospital
Gopichand Padalkar Story: भाजपचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकरांविषयीची 'ही' इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हांला माहिती आहे का.?

'ससून'कडून चौकशी का?

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून तनिषा भिसे हिच्यावर वेळेत उपचार करण्यात आले नाहीत, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे पत्र पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला दिले होते. ससून रुग्णालयाने त्यासाठी चौकशी समिती तयार करून त्या मार्फेत तनिषा भिसे ज्या ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या त्या सर्व रुग्णालयांची चौकशी केली तसेच त्यांचे उपाचाराचे कागदपत्रे तपासली.

सत्य समोर येणार?

तनिषा भिसे प्रकरणात माता मृत्यू समिती, आरोग्य विभाग, धर्मादायक आयुक्त यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली आहे. आता चौथा अहवाल ससून रुग्णालय पुणे पोलिस आणि वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे तनिषा हिच्यावर उपचार करत असताना दीनानाथ रुग्णालयात हलगर्जीपणा झाला का? या प्रकरणात ते दोषी आहेत की अन्य रुग्णालयात देखील उपचार करण्यात काही चूक झाली? या सगळ्याची उत्तरे या अहवालातून मिळणार आहेत.

Dinanath Hospital
Maharashtra Education Policy : महाराष्ट्रात आता इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com