Sanjay Raut News
Sanjay Raut NewsSarkarnama

Sanjay Raut News: पत्राचाळ प्रकरणी तुरुंगातून बाहेर काढण्यामागं पवार की ठाकरे ? संजय राऊत म्हणाले...

Maharashtra Politics: आतापर्यंत देशभरात ईडीकडून केलेल्या कारवायांमध्ये फक्त तीन महिन्यांत तुरुंगातून बाहेर आलेला एकमेव माणूस मी आहे.

Mumbai : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत हे शिंदे गट, भाजपवर सातत्यानं हल्लाबोल करत असतात. तसेच ते केंद्रातील मोदी सरकारसह शिंदे फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. याच राऊतांना काही महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 'ईडी'ने अटक केली होती.

एकीकडे राऊतांची लवकर तुरुंगातून सुटका होणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, १०४ दिवसांच्या तुरुंगवासानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात कुणाचा हात होता. याचा खुलासा आता स्वत: संजय राऊतां(Sanjay Raut)नी केला आहे.

Sanjay Raut News
Karnataka Election : कर्नाटक प्रचारात 'केरळा स्टोरी'ची एन्ट्री; दहशतवादी कटाचा खुलासा केल्याचा मोदींचा दावा!

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणावर भाष्य करतानाच ईडीच्या कारवाईतून तुरुंगातून बाहेर काढण्याच्या कायदेशीर लढाईवर मोठं विधान केलं आहे. तुरुंगातून बाहेर काढण्याचं सर्व श्रेय आपला भाऊ आणि ठाकरे गटाचा आमदार सुनील राऊत(Sunil Raut) यांना दिलं आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उध्दव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या व्यक्तींमध्ये खासदार संजय राऊत हे नाव सर्वात पुढे घ्यावे लागेल. जसे ते ठाकरेंच्या जवळचे आहेत तसेच ते शरद पवारांच्याही जवळचे मानले जातात. ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडत असतात. शिंदे गटासह भाजपवर टीका करण्यात ते नेहमीच आघाडीवर असतात.

Sanjay Raut News
Raj Thackeray News: आता जे झालं ते गोड माना..; राज ठाकरेंनी अजित पवारांचं तीन मिनिटातच...

कथित पत्राचाळ प्रकरणी त्यांना ईडी कारवाईला सामोरे जावे लागले होते. पवार आणि ठाकरेंशी चांगले संबंध असल्यानेच राऊतांची इतर तुरुंगातून लवकर सुटका झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, याबाबतीत स्वत:राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

...असा मी एकमेव माणूस!

राऊत म्हणाले, मी साडे तीन महिने तुरुंगात राहिलो. सुनील राऊत मला १०० टक्के तुरुंगातून बाहेर काढणार, याची मला खात्री होती. तो बाहेर काय करतोय, याची माहिती मी घेत होतो. त्याची मेहनत मी पाहत होतो. आतापर्यंत देशभरात ईडीकडून केलेल्या कारवायांमध्ये फक्त तीन महिन्यांत तुरुंगातून बाहेर आलेला एकमेव माणूस मी आहे. मी निष्कलंकपणे बाहेर आलोय, कोर्टाने माझी अटक बेकायदेशीर असल्याचंही नमूद केलं होतं.

Sanjay Raut News
Rajan Patil On Pawar Resign : पवारांच्या वयाचा विचार करता इतरांनी जबाबदारी घ्यायची की नाही? : राजन पाटलांचा बिनतोड सवाल

जेव्हा मी तुरुंगातून बाहेर आलो, तेव्हा मी उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)ना भेटलो. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले, संजय तू सुनीलमुळे बाहेर आलाय. त्यानंतर मी शरद पवारांकडे गेलो, तेव्हा शरद पवारही म्हणाले, तू बाहेर आलास ही सुनील राऊतची मेहनत आहे. हे खरं आहे की, ज्या पद्धतीने सुनील बाहेर कायदेशीर लढाई लढत होता, ती मलाही कधी जमली नसती.

राऊतांचा मोठा गौप्यस्फोट...

ज्या दिवशी 'ईडी'ने मला अटक केली, त्याच्या आदल्या दिवशी एका नेत्याचा मला फोन आला होता. आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलू, असं त्यांनी मला सांगितलं. पण मी त्याला नकार दिला. पण मी काहीही झालं तरी ईडीच्या समोर झुकायचे नाही असं आमच्या घरी ठरलं होतं.शिवसेनेच्या प्रतिमेला धक्का लागेल असे कोणतंही कृत्य करायचं नाही

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com