NCP Political Crisis: शरद पवार म्हणाले माझे फोटो वापरू नका, तुमची भूमिका काय? तटकरे म्हणाले..

Sunil Tatkare On Sharad Pawar : "याबाबत योग्य वेळ आल्यावर भाष्य करेन..."
Sunil Tatkare On Sharad Pawar :
Sunil Tatkare On Sharad Pawar : Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शक्तिप्रदर्शन करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. युती सरकारमध्ये अजित पवार सामील झाले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा, असे शरद पवार म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

याचबाबत आता अजित पवार समर्थक व खासदार सुनिल तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. "शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की, माझा फोटो वापरू नका. तरीही तुमच्या बैठकीच्या होर्डिंग्जवर शरद पवारांचा सर्वात मोठा फोटो आहे? असा प्रश्न सुनिल तटकरे यांना विचारण्यात आला होता.

Sunil Tatkare On Sharad Pawar :
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळे म्हणाले, तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री नव्हते म्हणून...

यावर उत्तर देताना सुनिल तटकरे म्हणाले की, "पवार साहेब आमचे गुरू आहेत. ते आमचे दैवत आहेत. आम्ही त्यांचा फोटो तर लावणारच. तसेच, बहुतांश आमदारांचा आम्हाला समर्थन आहे. न्यायालयीन लढाई होणार की नाही, याबाबत योग्य वेळ आल्यावर भाष्य करेन."

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार म्हणाले, 'माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कोणीही माझ्या परवानगी शिवाय फोटो वापरू नये, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता अजित पवार यांच्या गटाला फोटो न वापरण्याचीच सूचना शरद पवार यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.