Jitendra Awhad On Ajit Pawar Rebel : "साहेबांनी आजारपणात भाषणं करायची, पावसात भिजून सभा घ्यायचे; हेच मिळालं त्यांना आयुष्यात?"

Jitendra Awhad On Ajit Pawar Rebel : साहेबांनी आणखी काय द्यावं?
Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama

Jitendra Awhad On Ajit Pawar Rebel : अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या अजून काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजून काही जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे.

ज्या वयात आपल्या बापाने आपल्याला जे काही समृद्धी दिली, सगळे मानसन्मान दिले. त्या बापाल अशा परिस्थितीत आणणं, हे माणूसकीला शोभणारं नाही. वैचारिक लढाई सुरूच असेल. त्यांनी सगळे आमदार निवडून आणायचे, पावसात त्यांनीच भिजून सभा करायच्या, आजारपणात भाषणंही करायचं. हेच मिळालं त्यांच्या आयुष्यात त्यांना?

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्याची माहिती खुद्द जितेंद्र आव्हाड यांचीच पत्रकार परिषद घेत दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com