Sharad Pawar Phone To Malik : नवाब मलिक यांना शरद पवारांचा फोन; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Discussion On Phone To Nawab Malik : मलिकांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.
Nawab Malik Sharad Pawar
Nawab Malik Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीच्या अटकेतून नुकतेच जामीनावर सुटका झालेले माजी मंत्री नवाब मलिक यांना फोन केल्याची माहिती आहे. फोनवरून पवारांनी मलिकांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. सुटका झाल्यापासून मलिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. नेते मलिक यांची भेट घेत आहेत. यातच आता पवारांनी चौकशी केली असल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

Nawab Malik Sharad Pawar
Nawab Malik News: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची नवाब मलिकांसाठी 'फिल्डिंग'; पण मलिक घेणार 'हा' निर्णय?

शरद पवारांनी फोनवरून संवाद साधताना मुख्यत: नवाब मलिक यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. मलिक बाहेर आल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटाला पाठींबा देतील, याची चर्चा होती. मात्र मलिकांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे त्यांच्या आगामी भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिकांची सुटका झाली त्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली होती. तर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. यामुळे मलिक कोणत्या गटात जाणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र मलिक यांनी सद्या फक्त आरोग्यावर लक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.

Nawab Malik Sharad Pawar
Sharad Pawar Beed Sabha: धनंजय मुंडेंची बारी आलीच; शरद पवार बीडच्या आखाड्यात उतरणार

सुप्रिया सुळेंची भेट -

नवाब मलिक हे तुरूंगातून बाहेर आले, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. सुळे यांनी जवळपास चार तास मलिकांच्या प्रक्रृतीची विचारपूस केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाकडून नवाब मलिकांचा पाठिंबा आपल्यालाच मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com