Sharmila Thackeray: मुलावर गुन्हा, आई शर्मिला ठाकरेंची तळपायाची आग मस्तकात; पार्थ पवार ते शिवसेनेची लांबलेली सुनावणी असं सगळंच काढलं

Amit Thackeray News: छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नवी मुंबईतील नेरुळ इथं चार महिन्यांपासून झाकून ठेवला होता. झाकून ठेवलेल्या या पुतळ्याचे मनविसेचे अमित ठाकरे यांनी रविवारी कोणतीही परवानगी न घेता अनावरण केलं. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला राजकीय गुन्हा आहे.
Sharmila Thackeray  And Amit Thackeray
Sharmila Thackeray And Amit Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर नवी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजकीय नेत्यांना वेळ नसल्यानं मागील काही महिन्यांपासून धूळ खात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे अमित ठाकरे यांच्यावर हा संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच उद्धव ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या भावाच्या समर्थनार्थ पुढे सरसावल्याचं दिसून आलं. यानंतर मुलावर गुन्हा दाखल होताच आई शर्मिला ठाकरे यांची तळपायाची आग मस्तकात गेली असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

शर्मिला राज ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी मुंबईत एका उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर सोमवारी(ता.17) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमित ठाकरेंवरील गुन्ह्याचा संदर्भ घेत पार्थ पवार प्रकरण ते शिवसेना नाव,चिन्हाबाबतची प्रलंबित सुनावणीवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी बिहार निवडणुकीतील भाजपच्या विजयावरही प्रतिक्रिया दिली.

अमित ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत मला अभिमान असल्याचं शर्मिला ठाकरे म्हणाल्या,यावेळी त्यांनी मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते, अशी खोचक प्रतिक्रियाही दिली. यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजे, किल्ल्यावर हे नमो सेंटर उभारणार आहेत. किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आहेत. पण, आम्ही होऊ देणार नाही. निवडणुकीसाठी यांना केवळ महाराज दिसतात. पंतप्रधान तिथं येऊन गेले, पण त्यांना वेळ शिवरायांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी वेळ मिळाला नसेल, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला.

अमित ठाकरेंवरील (Amit Thackeray) गुन्ह्याच्या संदर्भानेच शर्मिला ठाकरे यांनी पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याबाबतही खोचक टिप्पणी केली. त्या म्हणाल्या,1800 कोटींचा जामीन घोटाळा होतो, पण गुन्हा दाखल होत नाही. सध्या खोटं बोला पण रेटून बोला असं काम सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Sharmila Thackeray  And Amit Thackeray
BJP Politics: नाशिकमध्ये मोठा राजकीय भूकंप,भाजपनं ठाकरेंचा ताकदवान नेता फोडला,मंत्री भुसेंच्या सुसाट राजकारणाला ब्रेक ?

शर्मिला ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या कार्यपध्दतीवरही कोरडे ओढले. त्या म्हणाल्या, मला सुप्रीम कोर्टाला सुध्दा प्रश्न विचारायचा आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस तीन वर्षांपासून सुरू आहे. सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की, त्यांना वेळच देत नाही. पण सध्या कोणाला बोलायचं हाच प्रश्न आहे. पक्षच बळावून घेतले जात आहेत. आता जानेवारीमध्ये निकाल देणार आहेत, तोपर्यंत निवडणुका होऊन जातात,असंही स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

याचवरुन शिवसेना व राष्ट्रवादीला आव्हान देताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, तुम्हाला निवडून येणार अशी खात्री आहे, तर मग तुम्ही मैदानात या आणि निवडणूक लढा. एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय आणि मग तुमच्याकडं कोण पाहणार? निवडणुका निघून जातील मग सुनावणी घेऊन काय होणार? असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला.

Sharmila Thackeray  And Amit Thackeray
Indurikar Maharaj: शरद पवारांच्या खासदाराकडून इंदुरीकरांची पाठराखण! म्हणाले, 'ते' कोट्यवधी रुपये खर्च करतात मग...

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुढे म्हणाल्या, बिहारमधील आकडेवारीनुसार तिथे 3.50 कोटी मतदार होते,पण मतदान 7 कोटी झाले आहे. मुंबईसह राज्यातून ट्रेन भरून तिकडे गेल्या आहेत, ते तिकडे आणि इकडेही मतदान करणार असल्याचा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. पण आता लोकांनी विचार केला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून मतदान करायला हवं, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

अमित ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल होताच, त्यांचे बंधू आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हे आपल्या भावासाठी मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरेंनी या गुन्ह्यासंदर्भात एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटलं आहे की, 'आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही!'

Sharmila Thackeray  And Amit Thackeray
Ladki Bahin Yojana : सरकारचा धडाकेबाज निर्णय! e-KYC ची अंतिम मुदत थेट डिसेंबर 2025 पर्यंत वाढली, मंत्री आदिती तटकरेंचीही मोठी घोषणा

'छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं. महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची,' असा ठाकरे शैलीत आदित्य ठाकरेंनी एक्सवरून इशारा दिला आहे.

अमित ठाकरेंवर पहिला राजकीय गुन्हा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नवी मुंबईतील नेरुळ इथं चार महिन्यांपासून झाकून ठेवला होता. झाकून ठेवलेल्या या पुतळ्याचे मनविसेचे अमित ठाकरे यांनी रविवारी कोणतीही परवानगी न घेता अनावरण केलं. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला राजकीय गुन्हा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com