Mahayuti Government : सत्तास्थापनेला वेग; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीत ‘त्या’ आमदारांना मंत्री न करण्याचा निर्णय

Shinde-Fadnavis meeting on government formation updates: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी रात्री उशिरा एक बैठक झाली असून त्यात मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. त्यात मंत्रिपदाबाबत एक महत्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 November : राजकीय सत्तास्थापनेला राज्यात वेग आला असून नवे मुख्यमंत्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी राजकीय रणनीती ठरविण्यासाठी महायुतीमधील पक्षांमध्ये बैठकांचा सिलसिला जोरात सुरू आहे. त्याच अनुषंंगाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी रात्री उशिरा एक बैठक झाली असून त्यात मंत्रिमंडळाबाबत चर्चा झाली. त्यात मंत्रिपदाबाबत एक महत्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (ता. 23 नोव्हेंबर) घोषित झाले. त्यात महायुतीला (mahayuti) अनपेक्षित असे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राज्यात तब्बल 132 जागा जिंकत भारतीय जनता पक्ष मोठा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57, तर राष्ट्रवादी काँगेसने 41 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठी उत्सुकता आहे.

दरम्यान, रविवारी (ता. 24 नोव्हेंबर) रात्री उशिरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात जवळपास एक तास बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही बैठक वर्षा बंगल्यावर झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Maharashtra Politic's : सत्तास्थापनेच्या घडामोडीत मोठी बातमी; मुख्य सचिवांनी घेतली अजित पवारांची भेट...

या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यासोबतच भाजप आणि शिवसेना पक्षातील संभाव्य मंत्रिपदाच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री झालेल्या बैठकीत दोघांमध्ये मंत्रिपदाच्या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाल्याची माहिती आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Assembly Election 2024 : तब्बल 19 भावांनी लढवली निवडणूक; 11 जण पोचले विधानसभेत, आठ जणांना आले अपयश...

गेल्या मंत्रिमंडळात ज्या आमदारांनी महायुतीमध्ये तेढ निर्माण केले आणि महायुतीला राजकीयदृष्ट्या संकटात आणलं, त्या सर्व आमदारांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवण्याचा निर्णय  झाला  आहे. त्यामुळे कोणत्या वादग्रस्त आमदारांना मंत्रिपदापासून लांब राहावे लागणार आहे, हे एक दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com