Shivsena Political News : शिंदे गटाच्या खासदाराचा घरचा आहेर; पालघर जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप

MP Rajendra Gavit News : शिंदे गटाच्याच हातात असलेल्या जिल्हा परिषदेवर खासदार गावितांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं खळबळ
MP Rajendra Gavit News
MP Rajendra Gavit NewsSarkarnama
Published on
Updated on

Virar : राज्यात सध्या भाजपा शिवसेना युतीत राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीवरुन वादाची ठिणगी पडली आहे. याच पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांनी राज्याच्या राजकारण चांगलंच तापलं आहे.याचदरम्यान, पालघरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

पालघर जिल्हा परिषदेमध्ये एकनाथ शिंदे गटाचे प्रकाश निकम हे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना शिंदे गटाच्या खासदार राजेंद्र गावित(Rajendra Gavit) यांनी जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने शिंदे गटातील बेबनाव समोर आला आहे.

MP Rajendra Gavit News
Sharad Pawar News : तामिळनाडूचे ऊर्जामंत्री बालाजी यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी, शरद पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले...

पालघरमधील शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांनी त्यांच्याच पक्षाच्या हातात असलेल्या जिल्हा परिषदेवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून दिली. भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मोखाड्यासारख्या भागातील शाळांची दुरुस्ती १८ वेळा करण्यात आली. तरी आता परत दुरुस्ती काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या ,जलमिशनमध्येही भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप गावित यांनी केल्याने पालघर(Palghar)मधील शिंदे गटात खळबळ उडाली आहे.

MP Rajendra Gavit News
Ahmednagar Politics : नगरमध्ये राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण; दुसऱ्यांदा धक्का...राजकारण तापलं

या भ्रष्टाराचाराबाबत शासनाने चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राजेंद्र गावित हे मूळचे काँग्रेसचे त्यानंतर त्यांनी भाजप(BJP)मध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेनं पालघरची लोकसभेची जागा भाजपकडून मागितल्यानंतर गावित यांनी शिवसेनेत प्रवेश करून ही जागा लढविली आणि जिंकली असली तरी ते आजही भाजपा नेतृत्वाच्या जवळ आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com