Sharad Pawar News : तामिळनाडूचे ऊर्जामंत्री बालाजी यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी, शरद पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले...

ED Raid On Thiru V Senthil Balaji : ''भाजपाच्या दहशतीचे राजकारण जनता पाहत आहे...''
ED Raid On Thiru V Senthil Balaji
ED Raid On Thiru V Senthil Balaji Sarkarnama

Mumbai : तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्या सचिवालयात आणि इतर ठिकाणी मंगळवारी (दि.१३) ईडीने छापेमारी केली. बालाजी यांच्याविरोधात झालेल्या या कारवाईचा विरोधी पक्षाने जाहीर निषेध व्यक्त केला. त्याशिवाय केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी (Thiru V Senthil Balaji) यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या छापेमारीवरुन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी भाजपवर आगपाखड केली आहे.

ED Raid On Thiru V Senthil Balaji
Ahmednagar Politics : नगरमध्ये राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण; दुसऱ्यांदा धक्का...राजकारण तापलं

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी ईडीच्या छापेमारीवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. भाजपाच्या दहशतीचे राजकारण जनता पाहत आहे असं एम. के स्टॅलिन म्हणाले. तसेच ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांनी ईडीला तपासात सहकार्य करणार असल्याचं सांगितलं. ईडी कशाचा शोध घेत आहे, याची माहिती नाही. पण, तपासाला संपूर्ण सहकार्य करणार असंही ते म्हणाले.

शरद पवारांचं सूचक ट्विट;म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar)यांनी तामिळनाडूचे ऊर्जामंत्र्यांवर कार्यालयावर ईडीने टाकलेल्या छाप्यावर भाष्य करतानाच मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या विरोधात उभा राहत असलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न ईडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात उठलेला आवाज दाबण्याच्या उद्देशाने ईडी(ED) आता दक्षिणेकडील राज्यांमध्ये पोहचली आहे असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

ED Raid On Thiru V Senthil Balaji
Rohit Pawar: रोहित पवार झाले आता खऱ्या अर्थाने कर्जतकर; गृहप्रवेशही झाला...

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री काय म्हणाले ?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या सचिवालयाच्या कार्यालयात झालेल्या ईडी कारवाईचा निषेध व्यक्त केला. त्याशिवाय दबावाची भाजपची ही रणनीती यशस्वी ठरणार नाही असा विश्वास व्यक्त केला. याशिवाय भाजप(BJP)चं सूडाचं राजकारण जनता पाहत आहे, 2024 मध्ये जनाताच भाजपला उत्तर देईल असंही स्टॅलिन म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू...

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनाही ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विरोधकांना धमकावण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करतो. राजकीय सूडबुद्धीने भाजपने आंधळे होऊन बदला घेत आहे. त्यामुळे आपल्या लोकशाहीचे कधीही भरून न येणारे नुकसान होतेय.

ED Raid On Thiru V Senthil Balaji
Shambhuraj Desai Big Statement : शिवसेनेची कोलांटउडी,जाहिरात आम्ही दिलीच नाही; शंभूराज देसाईंचा अजब दावा

खर्गेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल...

तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचा काँग्रेसने जाहीर निषेध केला. मोदी सरकारचा हा धमकावण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राजकीय विरोधकांविरोधात सरकारी यंत्रणाचा वापर करुन त्यांना दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलाय, हीच त्यांची ओळख झाली आहे. मोदी सरकारचे हे प्रयत्न विरोधकांना शांत करु शकत नाही, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

केजरीवाल यांचा भाजपला हल्लाबोल

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनाही ट्वीट करत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, विरोधकांना धमकावण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध करतो. राजकीय सूडबुद्धीने भाजपने आंधळे होऊन बदला घेत आहे. त्यामुळे आपल्या लोकशाहीचे कधीही भरून न येणारे नुकसान होतेय.

ED Raid On Thiru V Senthil Balaji
Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात सांगितली राज्य सरकारने केलेल्या कामांंची यादी; म्हणाले...

बॅनर्जींचा केंद्र सरकारवर निशाणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनीही मंत्री बालाजी यांच्यावरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. डीएमके यांच्याविरोधात भाजप सूडबुद्धीनं कारवाई करत आहे. भाजपकडून केंद्रीय यंत्रणेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून हे घृणास्पद आहे असल्याची टीका बॅनर्जी यांनी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com