Ahmednagar Politics : नगरमध्ये राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण; दुसऱ्यांदा धक्का...राजकारण तापलं

NCP News : कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला आज ( ता. 13) दुपारच्या सुमारास काळे फासण्यात आले.
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला आज ( ता. 13) दुपारच्या सुमारास काळे फासण्यात आले. हा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच केला असल्याची माहिती आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत आमदार रोहित पवार यांच्या पॅनलचे एक मत फुटले. त्यामुळे आमदार राम शिंदे यांच्या पॅनलच्या उमेदवारांना फायदा झाला.

सलग दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला अहमदनगरमध्ये धक्का बसला. जिल्हा बँकेत बहुमत असूनही राष्ट्रवादीला धक्का बसला होता. तर कर्जत बाजार समितीमध्ये रोहित पवार आणि राम शिंदे (Ram Shinde) यांच्या पॅनलला नऊ-नऊ जागा मिळाल्या होत्या. असे असताना राष्ट्रवादीचे एक मत बाद झाले आणि एक मत फुटल्याची चर्चा आहे.

Ahmednagar News
Shrikant Shinde News : मोठी बातमी : जाहिरातीवरुन राजकारण तापलं; खासदार शिंदे दिल्लीला रवाना : मोठ्या घडामोडीची शक्यता?

नगरमध्ये राष्ट्रवादीला सलग दुसऱ्यांदा धक्का बसल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घराला काळे फासले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्येच राजकारण तापले आहे. फाळके यांचा निषेध व्यक्त करणारे कार्यकर्ते रोहित पवार (Rohit Pawar) समर्थक असल्याचे बोलले जात आहे. कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडीसंदर्भात राष्ट्रवादीचे मत फुटल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

त्यामुळे सभापती व उपसभापती राम शिंदे गटाचे निवडून आले. त्यामुळे तो राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कर्जत येथील फाळके यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहीत घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. नुकतेच जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना पुरेसे संख्याबळ पाठीशी असतानाही पराभव झाला होता. त्याही वेळी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस यांच्या गटातील दोन मते फुटल्याचे आणि ही मते राष्ट्रवादीच्या सदस्यांची असल्याची मोठी चर्चा झाली होती.

Ahmednagar News
Ahmednagar Politics : कर्जत बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादीच्या जिव्हारी; जिल्हाध्यक्ष फाळकेंच्या घरालाच फासले काळे

त्यानंतर युवकचे कपिल पाटील आणि घुले समर्थक कार्यकर्त्यांनी याबाबत थेट पक्ष्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर पक्ष शिस्त भंगाची कारवाईची मागणी केली होती. या संदर्भात स्वतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नगरमध्ये आल्यानंतर जाहीर नाराजी व्यक्त करत संबंधितांना आपल्या पद्धतीने कडक शब्दात इशारा दिला होता. त्यानंतर आता कर्जत बाजार समितीमध्येही राष्ट्रवादीचे एक मत फुटल्याने कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाल्याचे समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com