मातोश्रीला शिंदे गटाचे नवे आव्हान; दादरमध्ये उभारणार प्रति शिवसेना भवन

CM Eknath Shinde| Uddhav Thackeray| हे शिवसेना (Shivsena) भवन म्हणजे शिवसैनिकांसाठी एक मंदिरच आहे.
Uddhav Thackeray|  CM Eknath Shinde|
Uddhav Thackeray| CM Eknath Shinde|
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे मुख्यालय म्हणजे दादर मधील 'शिवसेना भवन' आणि याच शिवसेना भवना मधून शिवसेनेचा कारभार हाकला जातो. हे शिवसेना (Shivsena) भवन म्हणजे शिवसैनिकांसाठी एक मंदिरच आहे. पण शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केलं. दरम्यान खासदार नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांना देखील फोडण्याचा प्रयत्न शिंदे (CM Eknath Shinde) गटाकडून झाला होता. आता शिंदे गटाकडून प्रतिशिवसेना भवन उभारून थेट मातोश्रीला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.

बाळासाहेबांनी उभारलेलं शिवसेना भवन जे दादरमध्ये आहे, त्याच दादरमध्ये येत्या महिन्याभरात प्रति शिवसेना भवन उभारले जाणार आहे. तसेच प्रत्येक वार्डा वार्डात शिवसेनेच्या शाखा आहेत तशाच शाखा शिंदे गटाकडून उभारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी देखील नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी दिली.

Uddhav Thackeray|  CM Eknath Shinde|
नाहीतर शिवसेनेचे सर्व आमदार आमच्यासोबत आले असते; केसरकरांचा गौप्यस्फोट...

शिंदे गटात इन्कमिंग सुरू आहे. आता शिंदे गटाच लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे. त्यासाठीच प्रति शिवसेना भवन, प्रति शाखा महिन्याभरात उभारण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता मुंबईतील शिवसेनेचे 40 ते 45 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असंही सदा सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे आता प्रति शिवसेनाच उभारण्याकडे भर देत आहेत, अस चित्र निर्माण झालं आहे. पण त्यात त्यांना किती यश येतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com