Balasaheb Thackeray Smarak : विनायक राऊतांनी शिंदे गटाची अक्कलच काढली; म्हणाले ‘मुळात उद्धवजी अध्यक्षपदी....’

Vinayak Raut criticizes Shinde group : प्रत्येक पक्षात निवडणुकीच्या काळात काही बेईमान आणि गद्दार लोकं निघतात. तसं शिवसेनेतही बेईमान आणि गद्दार लोक होते. इतरांनी टाकलेला तुकडा चाटायचा आणि स्वतःच्या पक्षाशी बेईमानी करणारी औलाद ही प्रत्येक पक्षात होती.
Eknath Shinde-Vinayak Raut-Uddhav Thackeray-Balasaheb Thackeray
Eknath Shinde-Vinayak Raut-Uddhav Thackeray-Balasaheb ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 14 January : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना हटविण्यात यावे, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे, त्यावरून माजी खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाची अक्कलच काढली आहे. ज्यांची अक्कल गुडघ्यात असते. त्यांना याबाबत काही कळणारच नाही, असा टोला लगावून ‘मुळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे हे नाहीत’, असा दावाही माजी खासदार राऊत यांनी केला आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हटविण्याचा ठराव शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. तो ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यावरून माजी खासदार विनायक राऊतांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, मुळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे हे नाहीतच, त्यामुळे जे नाही त्यावर आकांडतांडव करणारी औलाद शिंदेंच्या गटात आहे. त्यांची ही बकवासगिरी नेहमी चालू असते, त्याला आम्ही जादा किंमत देत नाही.

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले, त्यामुळे त्यांना हटवण्यात यावं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर राऊत म्हणाले, आम्ही त्यांच्यासारखे गद्दार झालो नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीचे अध्यक्षच नाहीत, त्यामुळे टेक्निकलचासुद्धा विषय या ठिकाणी येत नाही, असा दावाही विनायक राऊतांनी केला.

Eknath Shinde-Vinayak Raut-Uddhav Thackeray-Balasaheb Thackeray
Mahesh kothe : अकाली एक्झिटमुळे महेश कोठेंची 'ती' दोन स्वप्ने राहिली अधुरीच....

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चिपळूण कार्यकारिणीची काल बैठक झाली. त्या बैठकीत भास्कर जाधव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्या बैठकीत भास्कर जाधव यांनी शिवसेनेची काँग्रेस झाली आहे. निवडणूक काळात काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे काम केलं नाही. पण, त्यांना पदावरून काढण्याची आमच्यात हिम्मत नाही, असेही विधान केले आहे. त्यावर विनायक राऊतांनी स्पष्टीकरण दिले.

विनायक राऊत म्हणाले, प्रत्येक पक्षात निवडणुकीच्या काळात काही बेईमान आणि गद्दार लोकं निघतात. तसं शिवसेनेतही बेईमान आणि गद्दार लोक होते. इतरांनी टाकलेला तुकडा चाटायचा आणि स्वतःच्या पक्षाशी बेईमानी करणारी औलाद ही प्रत्येक पक्षात होती, त्यामुळे योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही करतच असतो.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिपळूण कार्यकारिणीची बैठकीत भास्कर जाधव यांनी काही सूचना केल्या आहेत. मात्र, त्याचं फार भांडवल करण्याची गरज नाही. त्यांचा मूळ मुद्दा हा होता की, पक्षाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी निश्चित करून देण्याची आवश्यकता आहे. ती सूचना योग्यच आहे. किंबहुना या सूचनेप्रमाणे पक्षाच्या घटनेत तसा बदल करण्याचे उद्धव ठाकरे यांनी मनावर घेतले आहे, त्यामुळे या सूचना केल्या म्हणजे त्यांनी काही वावगं केलेलं नाही, असंही विनायक राऊत यांनी सांगितलं.

Eknath Shinde-Vinayak Raut-Uddhav Thackeray-Balasaheb Thackeray
Narendra Modi Mumbai Tour : पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा; महायुतीच्या आमदारांसोबत स्नेहभोजन, कोणता कानमंत्र देणार?

विनायक राऊत म्हणाले, ज्यांनी निवडणूक काळात पक्षाचे काम केले नाही, त्यांना त्याबाबत जी काही विचारणा करायची आहे, ती केलेली आहे. त्यांना बाजूला करण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ निश्चित करण्याची आवश्यकता आहे. त्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांभीर्याने पाहत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com