
Ratnagiri News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव महाविकास आघाडीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
विशेषतः शिवसेना व काँग्रेसमधील कार्यकर्ते या पराभवाच्या धक्क्याने चलबिचल झाले आहेत. या निवडणुकीतील अपयशानंतर पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्यातच हे सर्वच जण धन्यता मानत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील एका बड्या नेत्यांनी एका कार्यक्रमावेळी मोठे विधान करीत शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.
शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेतील ज्येष्ठ नेते व आमदार भास्कर जाधव यांनी मनातली सल बोलून दाखवली. पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम हेदेखील यावेळी बैठकीला उपस्थित होते. त्याचवेळी आमदार जाधव यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर टीका केली.
यावेळी आमदार भास्कर जाधव (Bhaskar jadhav) म्हणाले, 'जे पदाधिकारी काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमत नाही. काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरे पद दिले जाते. त्यामुळे शिवसेनेची जवळ जवळ काँग्रेस झाली असल्याचेही जाधव म्हणाले. यावेळी त्यांनी शाखा प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांयचा कार्यकाळ निश्चित करा, असा सल्लाही त्यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना दिला.
पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्या नावाने फर्मान काढावे लागतात. निवडणूक काळातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत, असेही आमदार जाधव म्हणाले.
त्यांनी यापूर्वी अनेकवेळा पक्षासंदर्भात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात मोठा फटका बसला आहे. त्यामुळं पक्षाच्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल असेही जाधव यांनी यापूर्वी म्हटले होते.
शिवसेनेला पुन्हा उभारी येण्यासाठी काही बदल गरजेचे असल्याचेही जाधव म्हणाले होते. या विधानसभा निवडणुकीत कोकण पट्ट्यात मी एकमेव आमदार शिवसेना ठाकरे गटाचा निवडून आलो आहे. त्यामुळे शिवसैनिकांना शासनदरबारी योग्य तो मान मिळाला पाहिजे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.