Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंसाठी शिवसैनिक आशा रसाळ यांची अनोखी प्रार्थना

Shivsena : उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
Dombivli News
Dombivli NewsSarkarnama

Dombivli News : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आव्हानांचा डोंगर कोसळला. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह ही गमवावे लागले. राज्याच्या राजकारणात सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्षच उभा ठाकला आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या नव्याने पुन्हा एकदा भरारी घेण्याचे आव्हान आहे. असे असतानाच आपल्या पक्षाचे प्रमुख अडचणीत असल्याचे पाहता कल्याणमधील शिवसैनिक आशा रसाळ यांनी देवीच्या चरणी अनोखी प्रार्थना केली.

''जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही'', अशी शपथ रसाळ यांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा मातेसमोर घेतली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील कार्यकर्त्यांची ही निष्ठा आणि त्यांच्यासाठी केली जाणारी प्रार्थना पाहून शिवसैनिकांची मने हेलावली आहेत.

Dombivli News
Pimpri News : राष्ट्रवादीचे आमदार बनसोडेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? 'त्या' फोटोमुळे पुन्हा चर्चेत

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर ठाकरे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत.

कल्याणच्या आशा रसाळ यांची एक रणरागिनी म्हणून ओळख आहे. आशा यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. रसाळ यांनी मंगळवारी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरात देवीची पुजा आरती केली. यावेळी त्यांनी देवीच्या गाभाऱ्यात महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शपथ घेत देवीला साकडं घातलं आहे.

Dombivli News
Supreme Court hearing : कपिल सिब्बलांच्या युक्तीवादावर न्यायमूर्तींची टिप्पणी; न्यायालयात महत्त्वाची घडामोड

त्या म्हणाल्या, ''आज महाराष्ट्रावर संकट आलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे. शिवसैनिक म्हणून छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी अनवाणी राहीन.

चप्पल घालणार नाही.'' आशा रसाळ यांनी ही शपथ घेतल्यानंतर जमलेल्या भाविकांनी भवानी मातेचा तसेच उद्धव ठाकरे यांचा जयजयकार केला. उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.. असं म्हणत घोषणाबाजी केली.

Dombivli News
Supreme Court hearing : जुने सरकार किंवा जुने अध्यक्ष परत आणा, सिब्बलांच्या या युक्तीवादावर न्यायाधीश म्हणाले...

आशा रसाळ यांनी ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर राज्यातील तमाम महिला वर्ग तसेच सामान्य जनतेला उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केलंय. त्या म्हणाल्या, ''आज असत्याचा विजय होतो असं दिसतंय.

परंतु देवाच्या समोर सगळे सारखेच असतात. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरातील दुर्गाडी किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या जगदंबा मातेच्या चरणी आलो आहोत''.

Dombivli News
Mungantiwar : बहुमत म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती नाही, 'त्यांच्या' दावणीला बांधलेल्यांचा पक्ष कसा होईल?

देवीला हे साकडं घातलं आहे की,''सत्याचा विजय होणार आहे. सत्याला थोडं लढावं लागतं. तो संघर्ष चालू आहे. जोपर्यंत आमचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत मी अनवाणी राहीन, चप्पल घालणार नाही.

तमाम माता-भगिनींना विनंती करते की, तुम्ही सत्याच्या बाजूने उभ्या रहा. आपल्याला लवकरात लवकर विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे. शिवसैनिकच नाही तर सामान्य जनतेलाही मी सत्याच्या बाजूने उभे रहावे'', असे आवाहन करते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com