Shiv Sena dispute : शिवसेना अन् धनुष्यबाणाचा निकाल निवडणुकीच्या आधीच? सनद रद्द झालेल्या वकिलांनी दिली मोठी अपडेट

Supreme Court Hearing on Shiv Sena Party Symbol Case : असीम सरोदे यांनी याचिकेवरील सुनावणी लांबत असल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुन्हा पुन्हा तारीख मिळणे व या संविधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणे दुःखद आहे.
“Asim Sarode shares crucial updates from the Supreme Court regarding the Shiv Sena and Dhanushya Baan symbol verdict ahead of the local elections.”
“Asim Sarode shares crucial updates from the Supreme Court regarding the Shiv Sena and Dhanushya Baan symbol verdict ahead of the local elections.”Sarkarnama
Published on
Updated on

Impact of the Decision on Upcoming Local Body Elections : सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मागील काही महिन्यांपासून ही याचिका सुनावणीच्या प्रतिक्षेत आहे. आता त्यावर 12 नोव्हेंबरला बुधवारी सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू लढविणारे वकील असीम सरोदे यांनी ही माहिती सोशल मीडियातून दिली आहे. सरोदे यांची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही कोर्टात केस लढता येणार नाही. कोर्टाविषयी केलेल्या विधानावर ठपका ठेवत असोसिएशनने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, सरोदे यांनी सोशल मीडियातून दिलेल्या माहितीनुसार, धनुष्यबाण पक्षचिन्ह प्रकरणी 12 नोव्हेंबरला 19 नंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होईल, असे कामकाज यादीवरून दिसते. पक्षचिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल, असेही दिसते.

“Asim Sarode shares crucial updates from the Supreme Court regarding the Shiv Sena and Dhanushya Baan symbol verdict ahead of the local elections.”
Rahul Gandhi News : काँग्रेसच्या शिबीरात यायला 2 मिनिटे उशीर, पक्षाने राहुल गांधींना दिली शिक्षा; कार्यकर्त्यांसमोरच घडला प्रकार...

असीम सरोदे यांनी याचिकेवरील सुनावणी लांबत असल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुन्हा पुन्हा तारीख मिळणे व या संविधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणे दुःखद आहे. सर्वोच्च न्यायालयात वारंवार तारीख मिळणे याचा अर्थ कोणतीच न्यायिक-शिस्त नसणे असा आहे.

'तारीख पे तारीख' च्या ऐवजी 'तारीख पे न्याय' असे झाले तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील. काय द्यायचा तो निर्णय द्या. निकाल देतांना सकारण आणि स्पष्टीकरणांसह द्यावा, हे न्याय तत्व नक्की पाळा, अशी अपेक्षा असीम सरोदे यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

“Asim Sarode shares crucial updates from the Supreme Court regarding the Shiv Sena and Dhanushya Baan symbol verdict ahead of the local elections.”
CJI Gavai video viral : बूटफेक प्रकरणाचा ‘तो’ व्हिडीओ सरन्यायाधीश गवईंनीही पाहिला; आज भर कोर्टात काय म्हणाले?

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबतही उद्याच सुनावणी होण्याची शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे. ही याचिका ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरविल्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदेंच्या सेनेकडूनही ठाकरेंच्या आमदारांना पात्र ठरविल्याविरोधात नार्वेकरांच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com