Uddhav Thackeray Speech : विधानसभा निवडणूक निकालानंतरचा शिवसेनेचा पहिलाच मेळावा उद्धव ठाकरेंनी गाजवला; 'ही' आहेत 10 मोठी विधानं

Andheri Shivsena Melava 2025 : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा पहिलाच मेळावा असल्यानं त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. या मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दसरा मेळाव्यानंतर आता शिवसेनेत आणखी एक नवी परंपरा निर्माण झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तही गुरुवारी(ता.23) मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचा अंधेरीत तर वांद्रा येथील बीकेसीच्या मैदानावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असे दोन वेगवेगळे मेळावे पार पडले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्यानं त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. या मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात अंधेरीत झालेल्या मेळाव्यातील भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपवरही तोंडसुख घेतले.

मुंबईतील अंधेरीत आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त करताना त्यांच्यावरील टीकेचाही समाचार घेतला. यावेळी त्यांनी वांद्र्यामध्ये गद्दारांचा मेळावा सुरू आहे.गद्दारांना सांगतो,आज कदाचित तुम्ही जिंकला असं वाटत असेल. आज आम्ही हरलोत तरी जनता आमचं स्वागत करत आहे.गद्दार जिंकले असतील त्यांना जिंकवणारे अमित शाह असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Uddhav Thackeray
Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई होणार का? पालकमंत्री जयकुमार गोरेंचे मोठे विधान...

तसेच अमित शाह यांनी सत्तेसाठी बेकायदेशीरित्या यंत्रणा वापरल्या.पण शाह आहेत तोपर्यंत तुम्ही आहात. महापालिका होऊ द्या, तुमची काय वाट लागते ते पाहाच,असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. तसेच अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती.आता बसायचे तर बसा नाही तर गावाला निघून जा. बाजूला खुर्ची का लावली नाही, मंत्रिपद मिळालं नाही ,दावोसला नेलं नाही, गेले गावी.रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू.पण आता तुमच्या डोळ्यातले आसू दिसू लागलेत,असा चिमटाही शिंदेंना यावेळी उद्धव ठाकरेंनी काढला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.त्यातच विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वत:एकला चलो रे चे संकेत दिले आहेत.भाषणावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे घेतला जाईल असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Uddhav Thackeray
Eknath Shinde: स्वबळाचा नारा देणाऱ्या ठाकरेंना शिंदेंनी डिवचले; म्हणाले, 'घरी बसून निवडणूक ...'

उद्धव ठाकरेंच्या भाषणातले प्रमुख दहा विधानं...

* अमित शाहांनी अडीच वर्ष महाराष्ट्रावर घटनाबाह्य सरकार लादलं.

* एक निवडणूक जिंकलात म्हणून महाराष्ट्र संपत नाही.

* मुंबई महापालिकेसाठी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार

* मी हिंदुत्व सोडलं असा प्रचार करण्यात आला.

* गद्दार मला संपवू शकत नाही, पण मी गद्दारांना गाडणारच ..

* मिठी मारली तर प्रेमाने मारू, दगाबाजी केली तर वाघनखं काढू...

* मराठी माणसाच्या नादाला लागू नका. आम्ही औरंगजेबाला गाडलंय. अमित शाह किस झाड की पत्ती है?"

* जेव्हा निष्ठावंत शिवसैनिक म्हणेल की, मी बाळासाहेबांचे विचार सोडले,हिंंदुत्व सोडलं, तेव्हाच मी पद सोडेल.

* छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान,गृहमंत्री होते. त्यांनी तेव्हा बाळासाहेबांना अटक झाली, तर दंगल उसळेल म्हणून केंद्राचं दंगल नियंत्रक पथक, केंद्रीय राखीव दल मुंबईत पाठवलं होतं. दंगल झाल्यावर बंदोबस्त करायला. हे तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम. काढायची झाली तर तुमची सालटी खूप काढली जातील.

* लाज असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि एक तरी निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा. एक तरी, असे चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिले.

* जर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातला निकाल विधानसभा निवडणुकीत लागला असता तर दिल्ली त्यांच्या हातून गेली असती.

* भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढून दाखवावा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com