Anil Parab: अधिवेशनात महायुती सरकारवर तुटुन पडलेल्या अनिल परबांच्या अडचणी वाढणार, 'या' प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता

Mahayuti Government On Anil Parab : एकनाथ शिंदेंकडून याप्रकरणी अधिवेशन काळातच चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत.
Uddhav Thackeray-Anil Parab
Uddhav Thackeray-Anil ParabSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब यांनी महायुती सरकारवर जिव्हारी लागणारे टीकेचे बाण सोडले होते. त्यांच्यात आणि भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्यात सभागृहातच खडाजंगी पाहायला मिळाली होती. पण अधिवेशनाचे सूप वाजून काही तास उलटत नाही, तोच त्याच अनिल परबांच्या (Anil Parab) अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश आले आहेत. सेवानिवृत्तीनंतरही खरमाटे यांनी परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) याप्रकरणी अधिवेशन काळातच चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत. आरटीओतील माजी अधिकारी बजरंग खरमाटे यांच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांच्या नागपूर येथील घरावर आयकर विभाग आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे छापेही पडले होते.आता याबाबत आता मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Uddhav Thackeray-Anil Parab
BJP Vs Uddhav Thackeray: ठाकरेंची 'सौगात-ए-मोदी'वरुनची टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी; बावनकुळेंचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले...

दरम्यान, बजरंग खरमाटे हे ठाकरे गटाचे महत्वाचे नेते अनिल परब यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा खरमाटे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्यामुळे महायुती सरकारकडून ठाकरेंच्या शिवसेनेची धडाडती तोफ असलेल्या अनिल परबांच्याही अडचणी वाढवण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

यापूर्वी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबर 2021 मध्ये त्यांच्या नागपूर येथील घरी छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रही ईडीकडून जप्त करण्यात आली होती. मुंबईतील ईडी कार्यालयात त्यांची आठ तासांपेक्षा जास्त काळ कसून चौकशी करण्यात आली होती. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचं अनिल देशमुख प्रकरणातही खरमाटेंचं नाव पुढं आलं होतं.

Uddhav Thackeray-Anil Parab
Shivsena vs Kunal Kamra : मंत्री महोदय म्हणतात, थर्ड डिग्री देणार, टायरमध्ये घालून मारणार! नाव घेऊन टीका केली असती तर?

बजरंग खरमाटे आणि अनिल परब यांच्या आर्थिक संबंधांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरु आहे. याचवेळी आता आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीची भर पडल्याने खरमाटे यांच्यासह परबांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीसह आयकर विभागानं खरमाटे यांच्यावर बेनामी मालमत्ता जमवल्याचा ठपका ठेवला आहे.

...म्हणून माझाही छळ झाला!

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी अधिवेशनात केलेल्या एका विधानामुळे नवा वाद पेटला होता. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि पक्ष बदलावा म्हणून माझा छळ झाला,असे विधान करत अनिल परब यांनी आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. हे विधान करत त्यांनी स्वत:ची छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना केल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून करत सभाग़ृहातलं वातावरण तापवलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com