एकनाथ शिंदे विधान भवनात गडबडीने आले, पण एक चूक झाली अन्...

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे.
Eknath shinde

Eknath shinde

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : कोरोना पसरत असूनही विधान भवनात मंत्री, आमदार तोंडाला मास्क न बांधताच फिरत असल्यावरून संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरूवारी विधानसभेत बेजबाबदारांची कानउघाडणी केली. त्याला चोवीस तासही उलटले नाहीत, तोच शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी मास्क न लावताच विधान भवनात आले. माध्यमांचे कॅमेरे आपल्याकडे वळल्याचे पाहून शिंदेंनी 'पीए' कडून मास्क घेतला आणि तो तोंडाला बांधून विधीमंडळात गेले. आवारात काय तर विधीमंडळाचे कामकाज सुरू होताच विधानसभेत काही आमदारांनी मास्क घातला नसल्याकडे अजित पवारांनी पुन्हा लक्ष वेधले आणि मास्क घालण्याची विनंती केली.

कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढण्याच्या शक्यतेने या अधिवेशनात (Assembly Winter session) खबरदारी म्हणून उपाय केले आहेत. त्यामुळे लसीकरण (Vaccination) आणि कोरोना चाचणीशिवाय विधीमंडळात 'नो एन्ट्री' आहे. परंतु, सभागृहात काही बहुतांशी मंत्री, आमदार मास्क न लावत नसल्याचे दिसून येत आहेत. विधीमंडळाच्या आवारातही फिरताना मास्क न लावणाऱ्या मंत्री, आमदारांच्या बेशिस्तपणावर बोट ठेवत, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी सभागृहात नाराजी व्यक्त केली.

<div class="paragraphs"><p>Eknath shinde</p></div>
सावधान : पिंपरी-चिंचवड बनतोय 'ओमिक्रॉन'चा हॉटस्पॉट

मास्क नसेन; मलाही आत घेऊन नका, असे सांगत त्यांनी काळजी घेण्याचे आवाहनच केले. त्यामुळे शुक्रवारपासून विधीमंडळात येणारे मंत्री, आमदार आणि इतर मंडळी मास्क बांधूनच येण्याची आशा होती. मात्र, शुक्रवारी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी विधान भवनाच्या प्रवेशदारात आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मास्क नव्हता. ते गाडीतून उतरून आवारात आले तरीही मास्क नसल्याचे दिसून आले. तेव्हा पुढेच गर्दी केलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचे कॅमेरे शिंदेंना टिपत होते. त्यावेळी सावध होऊन शिंदे यांनी 'पीए' मास्क घेतला. त्यानंतर मास्क बांधून मामध्यांशी न बोलताना ते विधीमंडळात गेले.

<div class="paragraphs"><p>Eknath shinde</p></div>
रात्रीच्या लॉकडाऊनची चर्चा अन् अजितदादांनी फडणवीसांसह आमदारांचे टोचले कान

मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता चिंता व्यक्त होत आहे. त्यातून संचारबंदीसारखे उपायही केले जाण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेण्याचे आवाहन यंत्रणांकडून केले जात असतानाच लोकप्रतिनिधीच सुरक्षिततेच्या फारसी काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. सरकारकडून आज नवी नियमावली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com