Badlapur News : अक्षय शिंदेऐवजी अकबर खान, शेख असता तर..., बदलापूर प्रकरणावरून अंधारेंचा नितेश राणेंवर हल्लाबोल

Sushma Andhare Criticizes Nitesh Rane On Badlapur Rape Case : ""देवेंद्र फडणवीस हे मागच्या १० वर्षांमध्ये साडेसात वर्षे गृहमंत्री आहेत. ज्या पालकांनी न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हा दाखल करता? आणि तो वामन म्हात्रे महिला पत्रकारावर घाणेरडी कमेंट करतो, त्याला माफ करता."
Nitesh Rane, Sushma Andhare Badlapur Case
Nitesh Rane, Sushma Andhare Badlapur CaseSarkarnama
Published on
Updated on

Badlapur Rape Case : बदलापुरमधील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापलं आहे. तर विरोधकांनी ठिकठिकाणी सरकारविरोधत आंदोलन करत सरकारच्या कार्यपद्धीतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय ज्या शाळेत हा प्रकार घडला ती भाजपच्या लोकांशी संबंधित असल्यामुळे कारवाईला उशिर झाल्याचा आरोपही विरोधक करत आहेत.

अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांनी, अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर नितेश राणेने थयथयाट केला असता, असं म्हणत भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे.

दरम्यान, सकाळ वृत्तपत्राच्या महिला पत्रकारावर घाणेरडी कमेंट करतो, त्याला माफ करता? आणि न्याय मागणाऱ्यांवर गुन्हा दाखल करता? असा सवाल विचारत त्यांनी फडणवीस आणि शिंदेंवर निशाणा साधला. अंधारे म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मागच्या 10 वर्षांमध्ये साडेसात वर्षे गृहमंत्री आहेत.

Nitesh Rane, Sushma Andhare Badlapur Case
Raj Thackeray : बदलापूर, लाडकी बहीणवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं; म्हणाले, स्वत:चं ब्रँडिंग...

ज्या पालकांनी न्याय मागितला त्यांच्यावर गुन्हा दाखल करता? आणि तो वामन म्हात्रे महिला पत्रकारावर घाणेरडी कमेंट करतो, त्याला माफ करता आणि अपेक्षा करता की लोकांनी शांत बसावं? वामन म्हात्रेंना वेगळी ट्रीटमेंट का? शिंदेंच्या जवळचा आहे म्हणून?"

Nitesh Rane, Sushma Andhare Badlapur Case
Badlapur Rape Case : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक

तर नितेश राणेने थयथयाट केला

दरम्यान, अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर नितेश राणेने (Nitesh Rane) थयथयाट केला असता. हलकटपणा आहे, तुम्ही जात, धर्म पक्ष बघून व्यक्त होता, अशी बोचरी टीका त्यांनी नितश राणेंवर केली. तर बदलापूरच्या घटनेत न्याय मिळाला असता, तर लोक रस्त्यावर का आले असते? पोलिस कमिशनर डुमरेंना प्रकरण नीट हाताळता आलं नाही. लोक का संतप्त झाले आता आशुतोष डुंबरेंचं काय करणार? असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com