Shivsena-NCP
Shivsena-NCPSarkarnama

राष्ट्रवादीवर शिवसेना नाराज : आघाडीसाठीची नियोजित बैठक रद्द

विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी महापौरांच्या डायसवर येऊन लोटांगण घातल्याने शिवसेनेच्या गटात नाराजी

ठाणे : महाविकास आघाडातील वरिष्ठ नेत्यांची महापालिका निवडणुकीस एकत्रित सामोरे जाण्याची धारणा आहे. मात्र, बुधवारी (ता. ३० डिसेंबर) पार पडलेल्या ठाण्याच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे (NCP) विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी महापौरांच्या डायसवर येऊन थेट लोटांगण घातल्याने शिवसेनेच्या (shivsena) गटात नाराजी आहे. यामुळे पालिका निवडणुकीत आघाडीपूर्वीच दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण झाली आहे. आघाडीसाठी होणारी गुरुवारची पहिलीच बैठक रद्द झाल्याची खात्रीलायक माहिती आहे, त्यामुळे ठाण्यात महाविकास आघाडीत मिठाचा खडा तर पडला नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. (Shiv Sena leader upset on NCP in Thane)

ठाणे पालिकेच्या निवडणुकीसाठी आघाडी व्हावी, अशी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची इच्छा आहे. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये विविध कारणांवरून खटके उडत आहेत. ठाणे पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी थेट महापौर नरेश म्हस्के यांच्या डायसवर येऊन लोटांगण घातल्याने राष्ट्रवादीकडून आघाडीत बिघाडी होत असल्याचे संदेश दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये गेला.

Shivsena-NCP
‘रिमोट कंट्रोल’चा फोन आला अन्‌ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!

सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाचे पडसाद गुरुवारी होणाऱ्या ठाणे पालिकेसाठीच्या आघाडीच्या नियोजित बैठकीवर दिसून आले. शानू पठाण यांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या महापौरांनी ही बैठकच रद्द केली. शिवसेनेच्या गोटात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेबद्दल नाराजी असल्याने ठाण्यात आघाडी होणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Shivsena-NCP
चंद्रकांतदादांचा नवा बॉम्ब : सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ!

यापूर्वीही लसीकरणासाठी कॅम्प देण्यावरून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर ठाण्यात आघाडी करण्यासाठी तसेच यासंदर्भात बैठका घेण्यासाठी आनंद परांजपे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, शानू पठाण यांच्या भूमिकेमुळे पालिका निवडणुकीच्या आघाडीत मिठाचा खडा पडला की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

Shivsena-NCP
उद्धवजींच्या शस्त्रक्रियेनंतर फडणवीसांचा रश्मीवहिनींना फोन; म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांचे आमच्यावर उपकार!

आमचा राग शिवसेनेवर नाही : परांजपे

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमचा राग शिवसेनेवर नसून पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या कार्यपद्धतीवर असल्याचे स्पष्ट केले. आघाडीसंदर्भात वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतले जात आहेत. आमच्या स्तरावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. मात्र, आयुक्त जर स्वतःला महासभेपेक्षा वरिष्ठ समजत असतील तर आम्ही आयुक्तांना घेराव घालायलाही कमी करणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, नियोजित बैठकीसंदर्भात आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com