
Mumbai News: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना मोठा धक्का बसला आहे.महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर शिरसाटांनी सिडकोच्या अध्यक्षपदावरही कायम होते. खरंतर मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी सिडकोचा राजीनामा देणं अपेक्षित होतं.पण त्यांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यानं अखेर राज्य सरकारकडून शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे.
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील (Shivsena) बंडानंतर भाजपसोबत सत्तास्थापन केली होती.त्यानंतर मंत्रिमंडळात आमदार संजय शिरसाटांचा मंत्रिपदासाठी पत्ताकट करण्यात आला होता. त्यामुळे नाराज झालेल्या शिरसाटांना अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारकडून सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती.
पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी ऐतिहासिक विजय मिळवत सत्तेत परतलेल्या महायुती सरकारमध्ये संजय शिरसाटांची मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.त्यांच्याकडे सामाजिक न्याय या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यानंतर त्यांनी सिडकोचे अध्यक्ष पद सोडणे आवश्यक होते.पण मंत्रिपद भूषवित असतानाच सिडकोच्या अध्यक्षपदावरही कार्यरत होते.
संजय शिरसाटांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यामुळे अखेर राज्य सरकारकडून गुरुवारी (ता.16) याबाबतचा अध्यादेश काढला. या अध्यादेशातून त्यांनी संजय शिरसाटांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवल्याची घोषणा केली.हा शिरसाटांना मोठा धक्का आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.