MLA Disqualification Case : घाबरण्याची गरजच काय?; निकालापूर्वीच शिंदेंच्या आमदाराचा मोठा दावा

Shiv sena MLA Disqualification News : शिंदे गटातील आमदाराचे मोठे विधान....
Eknath Shinde, Vishwanath Bhoir
Eknath Shinde, Vishwanath Bhoir Sarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान-आचार्य

Thackeray Group Vs Shinde Group Maharashtra Politics :

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल अवघ्या काही तासांत लागणार आहे. यासंदर्भात कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मोठा दावा केला आहे. समोरच्या पक्षाने कितीही देव पाण्यात टाकले तरी निकाल आमच्या बाजूने लागेल हा विश्वास आहे, असे ते म्हणाले.

Eknath Shinde, Vishwanath Bhoir
MLA Disqualification Result: निकालाआधीच नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले, 'निकालातून सर्वांना...'

आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून कोणतीही भीती नाही. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एका रात्रीत सत्ता पालटवून टाकली. जेव्हा शिंदेसाहेबांबरोबर गेलो त्यावेळी आमचे आयुष्य अंधारात होते. तेव्हा घाबरलो नाही, तर आता या निकालाला घाबरण्याची गरजच काय? असा प्रश्न त्यांनी केला.

विरोधकांचा सध्याचा असणारा आसुरी आनंद काही तासांपुरताच आहे, असे सांगताना निर्णय कोणाच्या बाजूने लागणार, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळेच आम्ही निर्धास्त आहोत, असा दावा भोईर यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेतून शिंदे बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत ते 40 आमदारांना घेऊन सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटी, गोवा करीत ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि अखेर भाजपशी हात मिळवत शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले आणि उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू होते.

अचानक झालेल्या सत्तांतरामुळे आमदार अपात्रतेचा मुद्दा आला. या सगळ्या प्रकरणावर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी 4 वाजता निर्णय देणार आहेत. सध्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार, नेते आणि कार्यकर्ते हे या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.

edited by sachin fulpagare

R...

Eknath Shinde, Vishwanath Bhoir
MLA Disqualification Case: हालचालींना वेग; आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com