Shiv Sena MLA Disqualification : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुप्रीम कोर्टाची नोटीस, दोन आठवड्यांमध्ये...

Supreme Court : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा सवाल केला. त्यावर यामध्ये खूप वेळ जाईल, असे उत्तर देण्यात आले.
ShivSena MLA Disqualification
ShivSena MLA Disqualification Sarkarnama
Published on
Updated on

Delhi : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी नुकताच निकाल दिला. एकनाथ शिंदे यांना दिलासा नार्वेकरांनी दिला. त्यामुळे नाराज झालेला ठाकरे गट सर्वोच्च न्यायलयात गेला आहे. विधासभाध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस जारी केली आहे.

ShivSena MLA Disqualification
Ravindra Dhangekar : काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना भाजपची ऑफर? ; 'या' नेत्याच्या विधानाने जोरदार चर्चा!

या नोटिशीप्रमाणे शिंदे यांना पुढील दोन आठवड्यांत आपले म्हणणे न्यायालयात सादर करायचे आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड (DY Chandrachud) यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा सवाल केला. त्यावर यामध्ये खूप वेळ जाईल, असे सांगत सुप्रीम कोर्टातच याप्रकरणी सुनावणी घेण्याची विनंती ठाकरे (Uddhav thackeray) गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली.

आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांना दिलासा दिला. दोन्ही गटातील आमदारांना अपात्र ठरवले नाही. मात्र, शिवसेना एकनाथ शिंदेंची असून भरत गोगावले यांचा व्हीप योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून महापत्रकारपरिषद घेत राहुल नार्वेकर यांच्यावर जाहीर टीका केली. आपण जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे जाहीर केले होते.

R...

ShivSena MLA Disqualification
Jalgaon Politics : उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे कारण उमेदवारी, नव्हे वेगळेच?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com